Tuesday, September 17, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमा. नगरसेवक संतोष सुरेश पाटील व " शिवसेना - युवासेना " कर्जत...

मा. नगरसेवक संतोष सुरेश पाटील व ” शिवसेना – युवासेना ” कर्जत आयोजित ” दहिहंडी थरार २०२४ “..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) ” भारतीय संस्कृती व एकात्मता , संघटन व बंधुता ” यांचे दर्शन घडविणारा उत्सव म्हणजे ” दहीहंडी ” . नेहमीच अश्या उत्सव व सणांना प्राधान्य देवून तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी दरवर्षी ” शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत ” यांच्या पुढाकाराने कर्जत शहरात दहीहंडी उत्सवाचा थरार – २०२४ ” यावर्षी देखील आकर्षक बक्षिसे व मनोरंजनात मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. ” मित्रांनो थराला या नाहीतर धरायला या आपलं समजून गोविंदाला या ” असे आवाहन कर्जतकर नागरिकांना करत यावर्षी मा. नगरसेवक संतोष सुरेश पाटील व शिवसेना – युवासेना आयोजित दहिहंडी उत्सव मंगळवार दि. २७ ऑगस्ट २०२४ रोजी वेळ – सायंकाळी ५ – ०० वाजता. स्थळ – रिलायन्स पेट्रोल पंप जवळ , कर्जत-मुरबाड रोड , कर्जत येथे आयोजित करण्यात आला असून त्यात दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकास ” पारितोषिक १०६५६५ / – रू. रोख आणि आकर्षक चषक ” मिळणार आहे . महिलांसाठी ” लकी ड्रॉ ” मध्ये आकर्षक बक्षिसे पैठणी साडी , सोन्याची नथ , स्मार्ट घड्याळ मिळणार आहेत.

या दहीहंडी थरार – २०२४ उत्सवास श्री. संजोग वाघेरे – पाटील मावळ लोकसभा संघटक , बबनदादा पाटील – संपर्क प्रमुख , जयेश पाटील – सुप्रसिध्द सोन्या 5050 बैलाचे मालक , उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत हे प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत . रूपेश कर्णुक आयोजित ” आर्केस्ट्रा स्वरगंध ” संकल्पना – तेजस महाडीक यांचा हिंदी, मराठी , लावणी आणि कॉमेडीची धमाल , तसेच चेडोबा महिला नाच मंडळ आदिवासी करवबेळी ठाकूरवाडी (खडई) – खालापूर , काळकाई पुरुष नाच मंडळ माडप ठाकूरवाडी ( मुठा ) – खालापूर हे आदिवासी पारंपारिक नृत्य सादर करणार आहेत . फू बाई फू” फेम विकास समुद्रे , अभिनेत्री “विजेता” चित्रपट फेम तन्वी किशोरे (परब) , व “फू बाई फू” फेम जयवंत भालेकर हे प्रमुख आकर्षण असलेले कलाकार उपस्थित राहणार आहेत.

तरी गोविंदा पथकांनी योगेश दिघे – 9673475356 , तुषार बडेकर – 7378695050 , आकाश जाधव – 7775806789 , प्रमोद खराडे – 77989 96522 , राजू धराडे – 81490 88250 यांच्याशी संपर्क साधावा , व कर्जतकर नागरिकांनी या दहीहंडी उत्सवास उपस्थित रहावे , असे आवाहन आयोजक – मा. नगरसेवक संतोष सुरेश पाटील , कर्जत न. प. , व सौ. संचिता संतोष पाटील मा. नगरसेविका कर्जत न. प. यांनी केले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page