![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
लोणावळा (प्रतिनिधी): मा. शिवसेना जिल्हा प्रमुख मच्छिन्द्र खराडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा सर्व पक्षीय नेते मंडळी व मित्र परिवाराच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन हॉटेल महेश मासोळी वलवण येथे महेशभाऊ खराडे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले.
मच्छिन्द्र खराडे यांनी शिवसेनेसाठी विविध पदावर अनेक वर्षे प्रामाणिक पणे काम पाहिले. त्यांची कारकीर्द उल्लेखनीय असल्यामुळे लोणावळा परिसरातून विविध पक्ष पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष या सोहळ्यात उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतात मच्छिन्द्र खराडे यांच्या कार्याचा आढावा दिला.
यावेळी पिंपरी चिंचवड मा. महापौर व मावळ विधानसभा संघटक संजय वाघीरे,पिंपरी चिंचवड मा. नगरसेवक योगेश बाबर, राष्ट्रवादी काँग्रेस लोणावळा शहराध्यक्ष विलास बडेकर, आर पी आय चे प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, सुभाष डेनकर ,मनसे चे शहराध्यक्ष भारत चिकणे,काँग्रेस आय कमिटीचे शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ समाजसेवक नंदकुमार (बाबूजी) वाळंज,राष्ट्रवादी काँग्रेस नेते जीवन गायकवाड,युवा सेना जिल्हाप्रमुख अनिकेत घुले, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुरेश गायकवाड,शिवसेना कार्यकर्ते शंकर शिर्के, राजेश मेहता,मा. नगराध्यक्ष अमित गवळी, सुनील इंगुळकर, महेश खराडे यांसह अनेक कार्यकर्ते व मित्र मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.