Friday, September 20, 2024
Homeपुणेलोणावळामिरा महिला बहूउद्देशीय संस्थेचे तीन दिवसीय मोफत प्रशिक्षण शिबीर उत्साहात पार पडले...

मिरा महिला बहूउद्देशीय संस्थेचे तीन दिवसीय मोफत प्रशिक्षण शिबीर उत्साहात पार पडले…

लोणावळा(प्रतिनिधी): मिरा महिला बहूउद्देशीय सेवाभावी संस्था लोणावळा आयोजित महिलांसाठी तीन दिवसीय मोफत प्रशिक्षण शिबिरास महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मिरा महिला बहूउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने महिलांना सक्षम करण्यासाठी नवनवीन प्रॉडक्ट तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. तर काही महिला ज्यांना प्रशिक्षण घेणे जमत नाही अशा महिलांसाठी मोफत शिबिराचे आयोजन करण्यात येते. या महिलांना मोफत प्रशिक्षण देऊन घरबसल्या वस्तू तयार करून रोजगार निर्मितीसाठी सक्षम केले जाते.
यावेळी संस्थेच्या संस्थापीका रेश्मा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली दि.9,10,11 असे तीन दिवसीय मोफत प्रशिक्षण शिबीर राबविण्यात आले. या शिबिरात महिलांसाठी अगरबत्ती, धूपबत्ती, मेणबत्तीचे दिवे, पाण्यात तरंगणारे दिवे व दिवाळीचे उटणे आदी साहित्य तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. महिलांनी आमच्याकडे मोफत प्रशिक्षण घेऊन आपला घरगुती व्यवसाय करावा अशी आशा रेश्मा शेख यांनी व्यक्त केली.
सदर शिबिरात महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी मिरा महिला बहू उद्देशीय संस्थापिका रेश्मा शब्बीर शेख,अंजुम ऊमर शेख,दीक्षा मोरे,श्रद्धा पंचमुख, सुरभी गुप्ता, अमृता आदींनी विशेष परिश्रम घेतले.
- Advertisment -

You cannot copy content of this page