खालापूर (प्रतिनिधी ): शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात होऊन त्यांचे निधन झाल्याची घटना मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ घडली.
शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे यांचे आज पहाटे पाच वाचता मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर अपघाती निधन झाले आहे.
मुबंई पुणे एक्सप्रेसवे वरून आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे हे मुबंई कडे जात असताना माडप बोगद्याजवळ त्यांच्या गाडीने समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला, या अपघातात विनायक मेटे यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना तात्काळ एमजीएम रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरानी घोषित केले. तसेच
गाडीमध्ये मेटे यांच्या सोबत चालक आणि बॉडीगार्ड होते यातील चालक सुखरूप असून बॉडीगार्ड आणि पोलीस कर्मचारी यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मेटे यांच्या निधनाने शिवसंग्राम पक्षाचे मोठे नुकसान झाले, मेटे यांना मानणारा तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.घटनेची माहिती मिळताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा आमदार प्रवीण दरेकर हे इमजिएम रुग्णालयाकडे रवाना झाले आहेत.