Wednesday, August 6, 2025
Homeपुणेलोणावळामुंबई पुणे एक्सप्रेसवे वर कंटेनरचे ब्रेक फेल होऊन अपघात, चालक जखमी...

मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर कंटेनरचे ब्रेक फेल होऊन अपघात, चालक जखमी…

लोणावळा(प्रतिनिधी) : मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबई बाजूस किलोमिटर 36.00 च्या जवळ सकाळी 5.30 वाजताचे सुमारस ट्रेलर क्रमांक NL 01 AA 8987 चे ब्रेक फेल झाले . त्यामुळे चालकाचा ताबा सुटल्याने त्याने अज्ञात वाहनाला ठोकर दिली आणि तो ट्रेलर रस्त्याच्या कडेला असलेले बॅरिकेट्स तोडून थांबला.या अपघातात जायरहुसेन गुलबुद्दीन छोटे , वय 36 , रा . मध्यप्रदेश हा ट्रेलर चालक जबर जखमी होऊन गाडीमध्ये अडकून पडला होता.

या घटनेची खबर मिळताच बोरघाट वाहतूक पोलीस , आय आर बी पेट्रोलिंग , देवदूत यंत्रणा , डेल्टा फोर्स , मृत्युंजय देवदूत , आणि लोकमान्य यंत्रणेची अॅम्बुलन्स आदी यंत्रणा तिथे दाखल झाल्या . जवळपास अर्धा तास प्रयत्न केल्यानंतर त्या जखमी चालकाला बाहेर काढण्यात यश आले . चालकाच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून उपचारार्थ त्याला एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.


रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान काही काळ खोळंबलेली वाहतूक लागलीच मोकळी केली . खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा अपघात झालेला असल्याने पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे .

- Advertisment -

You cannot copy content of this page