Friday, November 22, 2024
Homeपुणेलोणावळामुंबई पुणे महामार्ग लोणावळा परिसरात एका गॅरेज समोरील अतिक्रमण हटवा, अन्यथा उपोषणाचा...

मुंबई पुणे महामार्ग लोणावळा परिसरात एका गॅरेज समोरील अतिक्रमण हटवा, अन्यथा उपोषणाचा इशारा,सुनील तावरे…

लोणावळा (लोणावळा): शहरातील पुणे मुंबई महामार्गालगत एका गॅरेज मध्ये करण्यात आलेले अतिक्रमण न काढल्याची तक्रार भाजपचे कार्यकर्ते सुनील तावरे यांनी नगर परिषदेकडे केली आहे. सदर अतिक्रमणे न काढल्यास उपोषण करण्यात येईल , असा इशारादेखील त्यांनी दिला आहे .
लोणावळा नगरपरिषदेला दिलेल्या निवेदनातून तावरे म्हणाले , पुणे – मुंबई महामार्गालगत अपोलो मोटर्स रिपेअरींग वर्क्स तर्फे बाळकृष्ण राघु राणे यांच्या मिळकतीमधील विना परवाना बांधकामाबाबत तक्रार करण्यात आली होती . लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने संबंधित मिळकतधारकास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 53( 1 ) अन्वये नोटीस बजावण्यात आली आहे . मात्र अद्यापही नगरपरिषदेच्या वतीने कारवाई झालेली नाही . मात्र , असे असूनही सदर बांधकामासंदर्भात कारवाई पूर्ण केली असल्याची माहिती उच्च न्यायालय गठित तज्ज्ञ समितीला नगरपरिषदेच्या वतीने देण्यात येत समितीचीही दिशाभूल करण्यात आली असल्याचे तावरे म्हणाले . कारवाई झाल्याच्या निषेधार्थ अखेर आपण उपोषणाचा इशारा दिला आहे , असे तावरे म्हणाले .
त्यावर संपूर्ण संबंधित बांधकामाचे मालकी हक्काचे, बांधकाम मंजुरीचे व याबाबतचे संपूर्ण कागदपत्रे नगरपरिषदेमधील अतिक्रमण विभागाकडे सादर करावी , असे कळविण्यात आलेले आहे . नोटिशीच्या अनुषंगाने कारवाई करण्यात येणार असून सध्या नियोजित असलेले उपोषण रद्द करावे , असे मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी सांगितले.
- Advertisment -

You cannot copy content of this page