Wednesday, March 12, 2025
Homeमहाराष्ट्ररायगड" मुख्यमंत्री " असलेल्या भाजप पक्षाचे नेते " सुरेश भाऊ लाड "...

” मुख्यमंत्री ” असलेल्या भाजप पक्षाचे नेते ” सुरेश भाऊ लाड ” यांचे १२ तास आंदोलन !

” अनपढ ” असलेले प्रांत अधिकारी ” संकपाळ ” यांची दिरंगाई…

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) गुरुवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता कर्जत खालापूर मतदार संघाचे ३ वेळा आमदार होऊन सत्ताधारी पक्षात राहिलेले व प्रशासकीय कामांचा दांडगा अभ्यास असलेले तर सध्या राज्याचे ” मुख्यमंत्री ” असलेल्या भारतीय जनता पक्षाचे नेते ” मा. आमदार सुरेश भाऊ लाड ” यांनी थेट कर्जत पोलीस ठाण्याच्या दारातच झोपून ” ठिय्या आंदोलन ” केल्याने कर्जत तालुक्या सहित रायगड जिल्हा ते मंत्रालय हादरून गेले . ” कल्पतरू ” या गृह निर्माण प्रोजेक्ट च्या बिल्डरने स्थानिक अपंग पांडू शिर्के या शेतकऱ्यांवर ” धाक दडपशाहीचा व गुंड शाहीचा ” वापर केल्याने कर्जत पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड , तहसीलदार धनंजय जाधव , प्रांत अधिकारी संकपाळ यांच्याकडे तक्रार करूनही न्याय देत नसल्याचा आरोप सुरेश भाऊ लाड यांनी केला .
त्यांच्या या आंदोलनामुळे पुन्हा एकदा कर्जत तालुक्यातील अधिकारी वर्ग म्हणजे ऐन होळीतील ” शिमग्याचे सोंग ” , ठरले असून असे कुत्सितपणे म्हणत तालुक्याला ” काळीमा ” फासण्याचे काम हे अधिकारी वर्ग करत असल्याची गरमा गरम चर्चा येथे ऐकण्यास मिळते.पळसदरी ग्रामपंचायत हद्दीत वरणे येथे सुरू असलेल्या ” कल्पतरू ” या गृह निर्माण प्रोजेक्टच्या बिल्डर विरोधात या अगोदर मा. आमदार सुरेश भाऊ लाड यांनी ३१ मे २०२४ रोजी कर्जत पोलीस ठाणे , कर्जत उप विभागीय पोलीस अधिकारी, कर्जत तहसीलदार , कर्जत प्रांत अधिकारी , जिल्हाधिकारी यांना जो पर्यंत शेतकऱ्यांची जागा मोजणी करून हद्द निश्चित केली जात नाही , तोवर कंपाऊंड टाकू नये , असे बिल्डरला सूचित करावे , हे अर्ज निवेदन करून सुचवले होते , तरी देखील या ” बुजगावणे अधिकारी ” वर्गाने कुठलीच भूमिका बजावली नव्हती.

एका सत्ताधारी पक्षाच्या ३ वेळा लोकप्रतिनिधी राहिलेले ज्येष्ठ ” लोकनेते मा. आमदार सुरेश भाऊ लाड ” यांना पोलीस ठाण्याच्या दारात लादीवर पेपर वर झोपून जे ” १२ तास ” आंदोलन करावे लागले , हि बाब कर्जतच्या राजकीय इतिहासात खूपच शरमेची असून प्रांत अधिकारी संकपाळ यांनी जे रात्री १ वाजता लेखी लिहून दिले , ते आश्वासन यापूर्वी देखील शेतकऱ्यांची बाजू ऐकून ते देऊ शकले असते , हा जमिनीशी संबंधित प्रश्न असल्याने तहसीलदार व प्रांत अधिकारी हेच ” अनाडी ” बनून काम करत असल्याचे या प्रकरणात दिसून येत आहे . तशी नाराजगी देखील सुरेश भाऊ लाड यांनी त्यांना बोलून दाखवली.

या प्रकरणात कर्जतची व रायगडाची भाजप देखील वरिष्ठ पातळीवर खूपच ” हलकी ” असून , मंत्री राहिलेले रवींद्र चव्हाण व बावनकुळे यांचे रात्री १ वाजेपर्यंत ” न्याय निवाडा ” करण्यास वेळ लागणे , म्हणजे भाजप पक्ष नेते व कार्यकर्त्यांनी न्याय हक्कासाठी आंदोलन केल्यास तातडीने त्यावर उपाय योजना करायची की , तब्बल १२ तास घालवायचे ? हा प्रश्न देखील उपस्थित चर्चेचा होत असून सत्तेत असलेल्या भाजपाने आता कर्जतच्या इतरही प्रलंबित असलेल्या कामांबद्दल ” कात ” टाकण्याची गरज असल्याची दमदार चर्चा सध्या कर्जतमध्ये होत आहे .
- Advertisment -

You cannot copy content of this page