Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी कर्जतकरांना दिलेला शब्द पाळला !

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी कर्जतकरांना दिलेला शब्द पाळला !

कर्जतकरांसाठी ५७ कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) ” चला घडवू या नंदनवन – कर्जत शहर नंबर वन ” असा संकल्प घेवून कर्जत खालापूर मतदार संघाचे ” आपला आमदार – कामगिरी दमदार ” म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते , असे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी करोडो रुपयांचा विकास निधी आणून विकासाची गंगा अवतरून गाव – परिसर – शहराचा कायापालट होत असताना दिसत आहे . आत्ता कर्जत शहरातील अनेक दिवसांपासून भेडसावत असलेली पाणी समस्या सुटणार असून आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या सातत्याने पाठपुराव्यामुळे ५७ . ९ कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना अखेर मंजूर झाली आहे.

कर्जत शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता पाणी समस्या सतत भेडसावत होती . २५ वर्षांपूर्वीची पाणी योजना लोकसंख्या वाढल्याने सर्व प्रभागात नागरिकांना पाण्याचा तुटवडा भासत होता . त्यामुळे महिला वर्गात संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना दिसत होत्या . याच आधारावर आमदार महेंद्र शेठ थोरवे हे नवीन पाणी पुरवठा योजनेकरिता आग्रही होते. राज्याचे मान. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब कर्जत येथे ” ऐतिहासिक वास्तूंच्या ” लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहिले असताना आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी त्यांच्याकडे हि मागणी केली असता त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून आज नवीन ” पाणी पुरवठा अमृत योजना ” मंजूर झाली आहे . कर्जत नगरपरिषदे करिता ५७ कोटी रुपयांच्या नळ पाणी पुरवठा योजनेस मंजुरी मिळाली आहे .

या पाणी पुरवठा योजनेस मंजुरी देवून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी कर्जतकरांना दिलेला शब्द पाळला असून ” एकच ध्यास – कर्जत खालापूरचा विकास ” हि संकल्पना घेवून विकासाच्या महामेरुची यशस्वी घौडदौड करणारे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page