if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यातील नावाजलेली ” मैत्रेय सोशल वेल्फेअर फाउंडेशन ” हालिवली यांच्या माध्यमातून २६ जानेवारी २०२४ या देशाच्या ” प्रजासत्ताक दिनी ” राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून , यांत प्रथम क्रमांकाने विजयी होणाऱ्या स्पर्धकास एक लाखाचे बक्षीस , द्वितीय क्रमांक ७५००० हजार रुपये , तृतीय क्रमांक ५०००० हजार रुपयांचे पारितोषिक मिळणार असून सन्मानचिन्ह देवून सन्मानित करणार असल्याने या स्पर्धेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या ” मैत्रेय सोशल वेल्फेअर फाउंडेशन ” हालिवली , ता. कर्जत , जि. रायगड यांच्या विद्यमाने नवनवीन उपक्रम राबवून जन सामन्यांत देशासाठी तसेच महापुरुषांच्या प्रती आदरयुक्त कार्यक्रम घेवून स्फूर्ती जागवून ” क्रांती ची मशाल ” नेहमीच तेवत ठेवण्याचे महान कार्य केले जाते . यावेळी देशाच्या ७४ वा ” प्रजासत्ताक दिन ” अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय संविधान नुसार आपल्याला या दिनी मिळालेले अधिकार , त्या अधिकारांचा तुम्ही कसा वापर करता , तुम्हाला या दिवसाचे कळालेले महत्त्व , तुम्ही हा दिवस कसा साजरा करता , म्हणूनच ” भारतीय संविधान जनजागृती अभियान राबविण्याच्या हेतूने स्पर्धा विषय – ” प्रजासत्ताक दिन सोहळा ” हा ठेवण्यात आला असून स्पर्धा नियम व अटी पुढीलप्रमाणे –
१) स्पर्धकांना कोणतीही वयोमर्यादा नाही
२) निबंध मराठी व हिंदी भाषेत ३००० ते ५००० शब्द मर्यादेत असावा.
३) परिक्षकांचा निर्णय बंधनकारक राहील.
४)स्पर्धेत बदल करण्याचा अधिकार संयोजकाकडे राहील.
५) निबंध PDF च्या माध्यमातून 8793195657 या क्रमांकावर पाठवावा किंवा maitreyaswf@.com या मेल आयडी वर पाठवावा.
स्पर्धकांनी नाव नोंदणी १० डिसेंबर २०२३ ते २० जानेवारी २०२४ पर्यंत करणे बंधनकारक आहे .
६) प्रवेश फी २५० रू.
७) स्पर्धकांनी जाहिरात वर दिलेल्या ” स्कॅनर ” वर प्रवेश फी पाठवावी.
८) बक्षीस वितरण समारंभ ” २६ जानेवारी २०२४ प्रजासत्ताक दिनी ” भव्य कार्यक्रमात ठेवण्यात आला आहे .
अधिक माहितीसाठी संपर्क –
संतोष सुरवसे – 9767182490
अंकुश सुरवसे – 8237418154
गोरख सुरवसे – 9767185660
या स्पर्धेतून मिळालेला फंड हा शिक्षण संस्थेसाठी खर्च केला जाणार असल्याने जास्तीत जास्त देशप्रेमी नागरिकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा , असे आवाहन ” मैत्रेय सोशल वेल्फेअर फाउंडेशन ” – हालिवली – कर्जत , अध्यक्ष अंकुश सुरवसे यांनी केले आहे.