भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो . याची सुरुवात यावर्षी चांगलीच झाली असून दोन दिवसांपूर्वी पडलेल्या जोरदार पावसामुळे मोठे वेणगाव येथे रहाणारे आनंद सोनावणे यांच्या घरासमोर पावसाचे पाणी साचून तळे झाल्याने व घरात पाणी शिरणार असल्याने त्यांच्या कुटुंबियांत घबराट पसरली होती . पहिल्याच पावसात हि अवस्था झाली असून पुढे पडणाऱ्या पावसाने काय अवस्था होईल ? या विचाराने ते चिंताग्रस्त झाले आहेत.
मोठे वेणगाव येथे दहिगाव कडे जाणाऱ्या रस्त्याच्या शेजारी आनंद सोनावणे यांचे घर आहे . पावसाळा सुरू होवूनही ग्रामपंचायतीने नाले सफाई केली नसल्याने डोंगरावरून व इतर ठिकाणाहून येणारे पावसाचे पाणी आनंद सोनावणे यांच्या अंगणात साठून पायरीपर्यंत आले . तर पाणी घरात घुसणारच होते म्हणून घरातील महिला भयभीत झाल्या . यावेळी पुरुष मंडळी कोणीच घरात नव्हते . या गंभीर बाबीची दखल घेऊन अद्यापी याठिकाणी अद्याप पर्यंत गटविकास अधिकारी , ग्रामसेवक असे कुणीही येवून पाहणी केली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे . त्यांच्या शेजारीच रहाणारे शिवाजी चौधरी यांच्या घरात देखील पाणी शिरणार होते.
पहिल्याच पावसात हि अवस्था झाली असेल तर , पुढे चार महिने पडणाऱ्या पावसामुळे आमच्या घरात चहूबाजूने पाणी शिरून आमचे ” वित्तहानी ” , सामानाचे नुकसान होणार असून जर पुरुष मंडळी अश्या वेळी घरात नसतील तर रात्रीच्या वेळी महिला भयभीत होतील , यामुळे याची त्वरित गंभीर दखल घेवून ग्रामपंचायतीने खबरदारी घेवून नालेसफाई करून आमच्या घरात पाणी शिरणार नाही , याचा बंदोबस्त करावा , अशी मागणी मोठे वेणगाव येथील आनंद सोनावणे यांनी वेणगाव ग्रामपंचायतीकडे केली आहे.