कर्जत:प्रतिनिधी-गुरुनाथ नेमाणे
दि.20.कर्जत ग्रामीण परिसरात मोबाईल नेटवर्क च्या कमतरतेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अडचणीची समस्या निर्माण झाली आहे.नागरिक वेळेवर मोबाईल रिचार्ज करत आहेत महिने दोन महिने चालेल असा नेट पॅक मारत आहेत.तरी त्यांना सुविधा मिळत नाही,कधी कुणाचा फोन येत नाही तर कधी अडचणीच्या वेळी कुणाला फोन लागतही नाही अशी दुविधा निर्माण झाली आहे.
मोबाईलचे केलेले रिचार्ज हे त्याठिकाणी सुरळीत नेटवर्क नसल्यामुळे वाया जात असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी जास्तीत जास्त घराच्या बाहेर पडण्याचे टाळले असता फोन वरून संपर्क करता बरीचशी कामे मोबाईल इंटरनेट वरून घरच्या घरीच होत असतात त्यात सध्या सर्व शिक्षण संस्था ह्या ऑनलाईन पद्धतीने अभ्यास घेत असून नेटवर्क नसल्यास येथील विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यायचे कसे? येथील नागरिकांना मोबाईल कंपनीकडून नेटवर्क सुविधा मिळत नसल्याची तक्रार वारंवार होत आहे.
त्यासंदर्भात मोबाईल नेटवर्क कंपनीला वारंवार तक्रार केल्यास महिना भर उडवा उडवीची उत्तर मिळत असल्याने कर्जत ग्रामीण भागातील नागरिक त्रासले आहेत. यावेळी सणासुधीच्या आणि कोरोना महामारीच्या काळात मोबाईल नेटवर्कच्या ह्या समस्येकडे लक्षदेणे काळाची गरज आहे.ही महत्वाची बाबा लक्षात घेता संचार मंत्र्यांनी याकडे स्वतः लक्ष घालावे अशी विनंती कर्जत ग्रामीण भागातून करण्यात येत आहे.