Friday, October 18, 2024
Homeपुणेलोणावळामोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त सोशल फाउंडेशन च्या वतीने खाऊ व शालेय वस्तूंचे वाटप..

मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त सोशल फाउंडेशन च्या वतीने खाऊ व शालेय वस्तूंचे वाटप..

एन. एम. एम. एम. ग्रुप जी वॉर्ड टेबल लँड तर्फे खाऊ शरबत आणि राजकीय पदाधिकाऱ्यांचे पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले….

लोणावळा (प्रतिनिधी):मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त लोणावळा सोशल फौंडेशन च्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

पैगंबर जयंती निमित्त लोणावळा सोशल फौंडेशन च्या वतीने बालग्राम वसतिगृहात तसेच लोणावळा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे खाऊ व शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले तसेच यावेळी सर्वांना गुलाब पुष्प देऊन फौंडेशनच्या वतीने स्वागत करण्यात आले.
तसेच मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त मुस्लिम बांधवांकडून इंद्रायणी नगर,टेबल लँड, मिनारा मस्जिद अशी भव्य दिव्य रॅली (जुलूस) चे आयोजन करण्यात आले.या जुलूस मध्ये लहान मोठे थोर मंडळी अथवा महिला व लहान मुलांचा मोठा सहभाग होता. डीजे च्या घनघनाटात दैदिप्य अशी मिरवणूक काढत मुस्लिम बांधवांकडून मोहम्मद पैगंबर जयंती उत्सहात साजरी करण्यात आली. यावेळी जयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी लोणावळा शहरातील राजकीय मंडळी ही मोठया संख्येने उपस्थित होती.
सदर जयंतीचे आयोजन लोणावळा सोशल फौंडेशनचे लतीफ खान, अलीम शेख, झाहीद सय्यद, अनिस तांबोळी, इमरान तांबोळी, सुरज मुजावर, परवेज शेख, कैफ बागवान, नवाज बागवान, अदनान शेख ,वसीम शेख यांनी केले होते. तर यावेळी लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष विलास बडेकर, युवक अध्यक्ष विनोद होगले, जाकीर खलिफा यांसह कार्यकर्ते मोठया संख्येने या आनंदोत्सवात सहभागी झाले होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page