Wednesday, October 23, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" या शिव सैनिकांनो , परत फिरा रे , पक्षाकडे आपुल्या "…

” या शिव सैनिकांनो , परत फिरा रे , पक्षाकडे आपुल्या “…

आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी ” दूर गेलेल्या शिवसैनिकांना ” दिली साद !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कडाव ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधकांनी केलेल्या अफवांना बळी जात कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या पासून दूर गेलेले कडाव व ग्रामीण परिसरातील ” मात्तब्बर नेते ” कडाव ग्रामपंचायतीचे मा. सरपंच ” सुदाम दादा पवाळी ” यांनी असंख्य कार्यकर्त्यांसोबत आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ” स्वगृही ” परतले असून त्यांनी आज सोमवार दिनांक २१ ऑक्टोंबर २०२४ रोजी ” शिवतीर्थ ” पोसरी येथे शिवसेनेत पक्ष प्रवेश केला . याप्रसंगी कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गट कर्जत ता. संपर्क प्रमुख , सुदाम पवाळी व असंख्य कार्यकर्ते , राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गट – प्रदेश सचिव उल्हास भुर्के , अमोल पाटील व असंख्य कार्यकर्ते , भाजप – पत्रकार रमाकांत जाधव व मनसे – योगेश पोथरकर त्याचप्रमाणे या पक्षातील प्रमुख पदाधिकारी सहित कार्यकर्ते , महिला वर्गांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत पक्ष प्रवेश करत हा सोहळा संपन्न झाला.

यावेळी पक्ष प्रवेश सोहळ्यात मार्गदर्शन करताना सुदाम दादा पवाली म्हणाले की , कुणाला वाटले नव्हते की हा पक्ष प्रवेश सोहळा होईल , कारण विरोधकांनी गाठ मारून ठेवल्या होत्या , हा पक्ष प्रवेश करताना कुठलं घबाड नाही घेतलं , पद नको , ना जिल्हा परिषदेची उमेदवारी , मी निष्ठावंत शिवसैनिक आहे , दिड वर्षे मला विश्वासात न घेता , ” कट कारस्थान ” करून सापत्नपणाची व माझ्या गावात येवून मला वेगळी वागणूक देणाऱ्या ठाकरे गटातील उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत व त्याच्या पाठीराख्यांना धडा शिकवण्यासाठी मला काम करायचे आहे , मधल्या काळात खूप गोष्टी झाल्या , माझ्या ग्रामपंचायत मधील अनेक कार्यकर्त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून आज पक्ष प्रवेश केला आहे , भविष्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मी ठाकरे गटाच्या उमेदवाराला ३ नंबरला पाठवणार , अशी ” भिष्म प्रतिज्ञा ” याप्रसंगी सुदाम दादा पवाळी यांनी सर्वांसमोर केली . यावेळी ” शिवसेना कर्जत तालुका प्रमुख पदी ” त्यांची नियुक्ती कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी करून त्यांना सन्मानित केले.

यावेळी प्रमुख उपस्थिती आमदार महेंद्र शेठ थोरवे , जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर , उपजिल्हा प्रमुख भाई गायकर , जेष्ठ नेते हनुमंत शेठ पिंगळे , जिल्हा संपर्क प्रमुख विजय भाऊ पाटील , जिल्हा सह संपर्क प्रमुख संभाजी जगताप , जिल्हा उपसंघटक अरुण देशमुख , विधानसभा संपर्क प्रमुख पंकज पाटील , ता. संघटक शिवराम बदे , युवा ता. प्रमुख अमर मिसाळ , मा. उपसभापती मनोहर दादा थोरवे , वैद्यकीय कक्ष जिल्हा प्रमुख डॉ. शेखर जांभळे , संपर्क प्रमुख दिलीप ताम्हाणे , मा. नगरसेवक ऍड. संकेत भासे , शहर प्रमुख अभिषेक सुर्वे , संघटक नदीम भाई खान , सनी चव्हाण , मा. पंचायत समिती सदस्या सौ. मीना थोरवे , सौ. मनिषा भासे , खालापूर महिला संघटिका रेश्मा आंग्रे , शहर संघटिका सायली शहासणे , मा. जिल्हा परिषद सदस्या सौ. थोरवे , संघटक दिनेश कडू , त्याचप्रमाणे मतदार संघातील शिवसेना – युवा सेना – महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेली अनेक महिन्यांपासून शिवसेना कर्जत ता. प्रमुख संभाजी जगताप यांनी ठाकरे सेनेचे संपर्क प्रमुख सुदाम दादा पवाळी हे शिवसेनेत येण्यासाठी खूप प्रयत्न केले , तर आपले पद त्यांना देवून मनाचा खूप मोठेपणा दाखविल्याने आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी सभाजी जगताप यांचे ” कौतुक ” करत त्यांना ” जिल्हा सह संपर्क प्रमुख ” पद बहाल केले . हा पक्ष प्रवेश म्हणजे आमच्या ” विजयाची नांदीच ” असल्याचे मत आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी व्यक्त केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page