Sunday, June 1, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडयोगेश आप्पा गायकवाड यांची कन्या रत्न " सह्याद्री " हिचा नामकरण व...

योगेश आप्पा गायकवाड यांची कन्या रत्न ” सह्याद्री ” हिचा नामकरण व प्रथम वाढदिवस उत्साहात साजरा !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) आजकालच्या जगात मुली या कुटुंबाचा ” आधार ” बनत आहेत . त्यांच्या जन्माने घरातील ” वैभव ” हि वाढते व ” आनंद ” हि द्विगुणित होतो . अतिशय हुशार व तल्लख बुद्धी प्राप्त करून शैक्षणिक क्षेत्राबरोबरच इतर सर्व क्षेत्रात मुलीच ” अव्वल ” ठरत आहेत . आपल्याही घरात प्रथम ” मुलगीच ” व्हावी , अशी ईच्छा मनात बाळगून असलेले कर्जत नगर परिषद हद्दीतील कर्जत बौद्ध नगर येथील भीम गर्जना मित्र मंडळाचे सर्वेसर्वा ” योगेश आप्पा गायकवाड ” यांच्या घरात त्यांची पत्नी ” माही ” यांना कन्या रत्न प्राप्त झाल्यावर खूपच आनंद झाला . या कन्या रत्नाचे ” नामकरण व प्रथम वाढदिवस ” गुरुवार दिनांक १५ मे २०२५ रोजी रॉयल गार्डन हॉल मध्ये मोठ्या उत्साहात बौद्ध धम्म संस्कारात त्यांचे कुटुंब सदस्य , मित्र परिवार , बहुजन वर्ग , बौद्ध बांधव यांच्या उपस्थितीत पार पडले . यावेळी या कन्येचे नामकरण ” सह्याद्री ” असे ठेवण्यात आले.

बहुजन समाजाचे आधारस्तंभ , ” शिवशक्ती व भीमशक्तीचा ” वारसा खऱ्या अर्थाने पुढे नेणारे , कर्जत तालुक्यात सामाजिक कार्यात नावाजलेले ” भीम गर्जना मित्र मंडळाचे ” सर्वेसर्वा योगेश आप्पा गायकवाड व त्यांच्या प्रत्येक कार्यात साथ देणारी त्यांची ” सावली ” अर्थात त्यांची पत्नी ” माही गायकवाड ” यांना १५ मे २०२४ रोजी कन्या रत्न झाले . खूप गोड , शांत , पण हुशार असणारी या कन्या रत्नाचा नामकरण व प्रथम वाढदिवस रॉयल गार्डन हॉल मध्ये १५ मे २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजता मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील पठण करण्यात आले . यावेळी या कन्येचे नामकरण ” सह्याद्री ” तिच्या शांत निरागस स्वभावाला शोभेल असे आई माही , वडील योगेश आप्पा व आज्जी नंदा यांनी ठेवले . यावेळी सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले . यावेळी केक कापून आनंद व्यक्त करण्यात आला . यावेळी उपस्थित मान्यवरांनी ” सह्याद्री ” ला आशीर्वाद दिले.

या शुभ प्रसंगी मा. नगरसेवक बळवंत घुमरे , बिनिता घुमरे , भाजप मा. जिल्हा युवती प्रमुख सुषमा ढाकणे , शिवसेना शहर संघटक दिनेश कडू , बौद्धचार्य मनोहर ढोले , रोकडे , जाधव , संजय जाधव , विलास गायकवाड , आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष सचिन भालेराव , प्रदेश उपाध्यक्ष तथा भीम महोत्सवाचे अध्यक्ष ऍड. सुमित साबळे , संतोष आडसुळे , सुनील गायकवाड , राजू गायकवाड , बी एस पी चे सचिन चव्हाण , संतोष सोनावणे , भालचंद्र गायकवाड , भीम गर्जना मित्र मंडळाचे अध्यक्ष तुषार बेटकर , प्रदिप हिरे , चेतन गायकवाड , पंचायत समिती कर्जतचे अधिकारी , कर्मचारी वर्ग , त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने बौद्ध बांधव , त्यांचे कुटुंबीय , आप्तेष्ट , भीम गर्जना मित्र मंडळाचे सदस्य , सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या सदस्या मोठ्या संख्येने छोटी परी ” सह्याद्री ” हिला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page