कर्जत तालुक्यातील अनेकांचा ” राष्ट्रवादीत ” पक्ष प्रवेश.
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) आपल्या पक्षाचा कर्जत खालापूर मतदार संघात आमदार नसला आणि म्हणून आपण येथे सत्तेत नसलो तरी राज्यात आपण सत्तेत आहोत , आणि म्हणूनच येथील ” राष्ट्रवादीचे नेते सुधाकर भाऊ घारे ” सत्तेत असल्यासारखे सर्वांनी काम करा , असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ” मा. आमदार अनिकेत भाई तटकरे ” यांनी कर्जतमध्ये जनसंपर्क कार्यालयात शुक्रवार दि. २५ एप्रिल २०२५ रोजी आयोजित केलेल्या विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश कार्यक्रमात केले . यावेळी सालोख ग्रामपंचायत हद्दीतील मा. उप सरपंच आवेश जुवारी यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी व कर्जत तालुक्यातील अनेकांनी राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केल्याने या सर्वांचे स्वागत मा. आमदार अनिकेत भाई तटकरे यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर राजिप चे मा. सभापती तथा उपाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे , जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ दादा धुळे , राजिप चे मा. समाज कल्याण सभापती नारायण डामसे , जिल्हा संघटक दिपक श्रीखंडे , खालापूर अध्यक्ष संतोष बैलमारे , भूषण पाटील , सुरेखा खेडकर , पंचायत समिती मा. सदस्या जयवंती हिंदोळा , शरद कदम , स्वप्नील पालकर , केतन बेलोसे , सोमनाथ ठोंबरे , भानुदास पालकर , त्याचप्रमाणे कर्जत खालापूर मतदार संघातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते महिला वर्ग उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मा. आमदार अनिकेत भाई तटकरे म्हणाले की , राज्यात मित्र पक्षाची सत्ता असल्याने कळत न कळत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असतो , हा मतदार संघ तसा सोपा नाही , मुंबईचा प्रभाव इथे असतो त्यामुळे राष्ट्रवादीने येथे चढ उतार या मतदार संघात बघितला आहे . येथे पराभव झाला तरी दुसऱ्या दिवशी सुधाकर भाऊंनी नागरिकांच्या कामाला सुरुवात केली यावर प्रकाश टाकला . आपण आता पुढच्या राजकारणाला सुरुवात करा , कार्यकर्त्यांनी सारखी ” रि ” जोडू नका , पराभवाचे शल्य नक्कीच आहे , सर्वांना विश्वासात घेऊन पक्ष प्रवेश करत रहा , स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला कामाला लागा , असे आवाहन त्यांनी केले , युती महायुती होईल , ते नंतर बघू असेही त्यांनी सांगितले . आरक्षणात थोडा बदल झाल्याने नक्कीच अन्याय झाला आहे , याकामी कोर्टात पीटिशन दाखल करणार आहोत , अशी पक्षाची स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली . कार्यकर्त्यांनी जनतेशी जन संपर्क वाढवा , अधिक प्रभावी काम करायचं असेल तर सर्व पदाधिकारी यांनी ग्रामीण भागात जाऊन बूथ बांधणीचे काम करा , गाव दौरा करा , रोज पक्ष प्रवेश झाले पाहिजे असे काम सर्वांचे आहे , असे कौतुक त्यांनी याप्रसंगी केले , सुधा भाऊ सत्तेतच आहेत असे समजून सर्वांनी काम करा , सर्वांनी जबाबदारी उचला , मला व आदिती ताईला जेव्हढे प्रेम तटकरे साहेबांनी दिले तसेच प्रेम भाऊंना दिले आहे , आणि म्हणूनच योग्य वेळी सुधा भाऊंना नक्कीच न्याय दिला जाईल , असे कार्यकर्त्यांच्या मागणीला आश्वासन त्यांनी या प्रसंगी दिले . यावेळी राजिप चे मा. उपाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे , विधानसभा अध्यक्षा सुरेखा खेडकर , खालापूर अध्यक्ष संतोष बैलमारे , भूषण पाटील , यांनी देखील कार्यकर्त्यांना संबोधित केले .