Saturday, December 21, 2024
Homeमहाराष्ट्ररस्ता नसलेने उपचारा अभावी मातेचा व नवजात-अर्भकाचा मृत्यु...

रस्ता नसलेने उपचारा अभावी मातेचा व नवजात-अर्भकाचा मृत्यु…

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात म्हासुर्ली पैकी मधला धनगरवाडा येथे प्रसुतीवेळी २६ वर्षीय महिलेचा व नवजात अर्भकाचा मृत्यु झाला.
या धनगरवाड्याला रस्ताच नसलेने संबंधित महिलेवर वेळीच वैद्यकिय उपचार न झाल्यामुळे बाळ व मातेला जिव गमवावा लागला. म्हासुर्ली पैकी मधला धनगरवाडा पादुकाचा धनगरवाडा व रातंबिचा धनगरवाडा हे धनगरवाडे मुख्य रस्त्या पासुन सुमारे सात कि मी डोंगरात वसलेले आहेत.
येथे ये जा करण्यासाठी कुठलाही रस्ता नसुन फक्त पायवाट आहे.त्यामुळे येथील अत्यवस्थ अबाल वृद्धांसह नागरिकांना काट्याकुट्याच्या पायवाटेतुन बाजल्यावरून उपचारासाठी नेण्यात येते.बुधवारी रात्री २ वाजता येथील भागुबाई राजु घुरके या महिलेला प्रसूती वेदना सुरु झाल्या.
संबंधित महिलेला तेथील लोकांनी बाजल्यावरुन पक्क्या रस्त्या पर्यंत आणण्याचा प्रयत्न केलापण वाटेतच प्रसुती होणार असलेने त्यांनी त्या महिलेला पुन्हा घरी नेले.व तीची प्रसुती झाली,दरम्यान धामोड प्रा आ केंद्रामधुन वैद्यकिय पथक तेथे पोहचले,पण त्याआधीच त्या मातेचा व बाळाचा मृत्यु झाला.

पक्का रस्ता नसलेने वर्षभरात या धनगरवाड्या वरिल माता व बालका सह चार लोकांना आपला जिव गमवावा लागला असुन प्रशासन आणखि किती बळी घेणार असा सवाल धनगर समाजाकडून होत आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page