Wednesday, July 30, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडराजकीय क्षितिजावरील " लखलखता तारा " भावी नगराध्यक्ष राहुलजी डाळींबकर !

राजकीय क्षितिजावरील ” लखलखता तारा ” भावी नगराध्यक्ष राहुलजी डाळींबकर !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) ” रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ” ( आठवले ) पक्षाचे कर्जत तालुक्यातील ” झुंझार व आक्रमक नेतृत्व ” , बहुजन वर्गाच्या समस्या लक्ष देऊन सोडविण्याचे व समाज कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे एक ” लढवय्ये योद्धा ” म्हणून ” राहुलजी डाळींबकर ” यांच्याकडे बघितले जाते . ” जे बोलले ते करणारच ” असा त्यांचा स्वभाव असल्याने अनेकांना अडचणीच्या प्रसंगामध्ये पाठीशी उभे राहून ” मदतीचा हात ” देण्याचा त्यांचा हातखंडा असल्याने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून ते बहुजन समाजात कार्य करत असतात . रात्र असो की बेरात्र एक ” कॉल ” गेला तरी ते गरजूंच्या मदतीला धावत जातात . म्हणूनच कर्जत नगर परिषद हद्दीतील कर्जत बौद्ध नगर येथील केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नाम. रामदासजी आठवले साहेब यांचे निकटवर्तीय आर पी आय पक्षाचे कोकण प्रदेश कार्याध्यक्ष तथा ” मा. उपनगराध्यक्ष राहुलजी डाळींबकर यांचा राजकीय प्रवास ” संघर्षमयच ” म्हणावा लागेल.


सन १९८० ते १९९० च्या दशकात राहुल भाई यांनी ” पँथर ” या आक्रमक संघटनेत व नंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात बहुजनांचे नेते ” रामदासजी आठवले साहेब ” यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास सुरुवात केली. आर पी आय कर्जत तालुका अध्यक्ष झाल्यावर त्यांनी कर्जत तालुक्यात खूप आक्रमकपणे काम करत बौद्ध समाज व बहुजनांवर होणाऱ्या ” अन्याय अत्याचारा ” विरोधात आवाज उठवून न्याय देण्याचा प्रयत्न केला . त्याकाळी त्यांचे आंदोलने – मोर्चे – रस्ता रोको – बाजारपेठा बंद व या आंदोलनात त्यांची भाषणे त्यांच्या ” झुंझार नेतृत्वाची छबी ” दाखवून देत होती . यावेळी त्यांच्या सोबतीस पँथर चे डॅशिंग कार्यकर्ते होते . याच त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांना कर्जत नगर परिषदेची उमेदवारी देऊन समाजाप्रती असलेल्या त्यांच्या काम करण्याची तळमळी मुळे ते ३ वेळा नगरसेवक म्हणून निवडून गेले.

उपनगराध्यक्ष , बांधकाम सभापती , पाणी पुरवठा सभापती , आरोग्य सभापती अशी विविध पदे त्यांनी यशस्वीपणे सांभाळली . कर्जत शहरातील हातगाडी युनियन अध्यक्ष , रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष , कर्जत बौद्ध नगर येथील राहुल युवक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष , कर्जत सार्वजनिक बांधकाम विभाग ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष , कर्जत नगर परिषदेतील कामगार संघटनेचे अध्यक्ष, तर आर पी आय चे जिल्हा उपाध्यक्ष ते कोकण प्रदेश कार्याध्यक्ष अश्या विविध पातळीवर काम करत त्यांची कार्यकिर्द चमकदार असून बहुजनांचे ” कर्तबगार नेतृत्व ” , उद्याचे ” भावी नगराध्यक्ष ” म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते . ” एक छोटीशी मदत ” समोरच्या प्रसंगात अडकलेल्या व्यक्तीसाठी ” लाख मोलाची ” असते , हे आपल्या जीवनात घेतलेल्या अनुभवावरून जाणले असल्याने कधीही – कुणालाही मदत करण्यास अग्रेसर असलेले तर सामाजिक जाणीवतेचे भान ठेवून आपणही या समाजाचे देणे आहोत , या उद्दात हेतूने प्रेरित होऊन ते नेहमीच राजकीय – सामाजिक – धार्मिक – शैक्षणिक – सांस्कृतिक – आरोग्य – शासकीय कामे – पोलीस स्टेशन – कोर्ट कचेरी या माध्यमातून त्यांची सतत मदत सुरू असते . कोरोना काळात देखील अनेक नागरिकांना त्यांनी मदत केली . दिलदार मनाचा….दिलदार राजा…..असे झुंझार नेतृत्व राहुलजी डाळींबकर यांची ख्याती असल्याने ” राजकीय क्षितिजावरील हा चमकणारा तारा ” सर्वच क्षेत्रात ” अव्वल ” असल्याचे चित्र दिसत आहे.

त्यांच्या या अनमोल कार्यात सावली सारखी त्यांची पत्नी , मुलगा आलोक व सिद्धांत तर त्यांचे भाऊ व सर्व कुटुंबीय सदस्य तसेच त्यांच्या जीवा भावाचे सहकारी , विश्वासू व खंदे आर पी आय पदाधिकारी , कार्यकर्त्यांची फळी यांची साथ कायम असते .मावळ लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे , तर कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या विजयासाठी त्यांचे प्रयत्न नक्कीच खारीच्या वाट्या एव्हढे असले तरी ते खूप ” मोलाचे ” ठरले आहेत . ” विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन ” होण्यासाठी त्यांचे प्रयत्न , त्यांची कल्पकता व दूरदृष्टी वाखाणण्यासारखी असून या सुंदर वास्तूचे काम लवकरच तयार होण्याच्या प्रतिक्षेत आहे . अश्या या ” दमदार नेतृत्व – कर्तृत्ववान कामगिरी ” असणारे बहुजन व बौद्ध समाजासाठी अहोरात्र लढणारे ” लढवय्या योद्धा मा. उपनगराध्यक्ष राहुलजी डाळींबकर उर्फ R. D. ” यांच्या २७ जुलै २०२५ या वाढदिवसानिमित्त त्यांचे आरोग्य सुदृढ राहो , त्यांचे भविष्यातील सर्व स्वप्ने पूर्ण होवो , अशीच भगवंत चरणी प्रार्थना !

- Advertisment -

You cannot copy content of this page