Wednesday, March 12, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडराजकीय क्षेत्राबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रात अव्वल कार्य !

राजकीय क्षेत्राबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रात अव्वल कार्य !

” कर्जत महोत्सव – २०२५ ” मध्ये अवतरली दुबई सिटी..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) राजकीय – सामाजिक – शैक्षणिक – धार्मिक , क्षेत्रात सामाजिक हित जोपासत कर्तव्य निभावत अव्वल कार्य करणारे भारतीय जनता पक्षाचे नेते तथा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष व संकल्प सामाजिक संस्थेचे सर्वेसर्वा सुनील गोगटे यांनी ” सांस्कृतिक ” जगात देखील उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे . गेली अनेक वर्षे आपल्या नेहमीच्या दगदगीच्या जीवनातुन बाहेर पडून सर्वांना कुटुंबासमवेत वेळ काढून ” विरंगुळा ” म्हणून सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील ” कर्जत महोत्सव – २०२५ ” चे शानदार आयोजन कर्जतमध्ये ” डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार ” येथील भव्य मैदानावर केले असून यावेळी कर्जतकरांना कर्जतमध्ये बसून दुबई सिटी पहाण्यास व उभारलेल्या खेळ सामुग्रीत आनंद घेण्यास मिळणार आहे.

संकल्प सामाजिक संस्था व भारतीय जनता पार्टी कर्जत यांचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या ” कर्जत महोत्सव – २०२५ चे शानदार उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा मा. नगराध्यक्ष वसंतराव भोईर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी आयोजक सुनिल गोगटे – भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष किसान मोर्चा, कर्जत शहराध्यक्ष विजय जिंनगरे, मा. महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कल्पना दास्ताने , भाजप महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष स्नेहा गोगटे , युवा मोर्चाचे जिल्ह्याचे खजिनदार मिनेश मसणे, युवा मोर्चा शहराध्यक्ष सर्वेश गोगटे , संकल्प सामाजिक संस्थेचे सचिव समीर सोहोनी, सदस्य किशोर वैद्य , महिला मोर्चा ता. सरचिटणीस राधा बहुतुले, कर्जत ता. महिला मोर्चा उपाध्यक्ष वर्षा सुर्वे , महिला मोर्चा ता. उपाध्यक्ष प्रीती तिवारी, अंकिता तिवारी, योगेश पोथरकर , रमाकांत जाधव , साईश्रुत सोनवणे, धरम इजारे , महेंद्र कांबळे, चेतन सुर्वे असे अनेक भाजप पदाधिकारी , कार्यकर्ते , संकल्प संस्थेचे कार्यकर्ते आणि कर्जत मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

चक्क दुबई सिटी वसलेला हा ” कर्जत महोत्सव ” २५ मार्च २०२५ पर्यंत सायंकाळी सहा ते दहा वेळेस चालू राहणार आहे . यामध्ये आता अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धांचे नियोजन असून काही सामाजिक उपक्रम , आरोग्य विषयक माहिती सुद्धा या महोत्सव कालावधीमध्ये देण्यात येणार आहे . या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेला ” थीम पार्क ” यामध्ये दुबई येथील ” बुर्ज खलिफा दुहेरी या टॉवर , रशियन चार्ज मलेशियन टॉवर , लंडन ब्रिज , ” असे विविध सेल्फी पॉईंट्स रोषणाईने झगमगाट सहित उभारण्यात आलेले आहेत. खाऊ गल्ली , याचप्रमाणे पुढील कालावधीत विविध ” स्पर्धांचे आणि इव्हेंटचे ” उद्घाटन विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते होणार आहेत , अशी माहिती भाजप किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष व संकल्प सामाजिक संस्थेचे सर्वेसर्वा आयोजक सुनील गोगटे यांनी देत , या अद्वितीय – रोमांचकारी ” कर्जत महोत्सव – २०२५ ” मधील विविध आकर्षणाचा लाभ येथे भेट देऊन घ्यावा , असे आवाहन व निमंत्रण देखील समस्त कर्जतकर नागरिकांना , महिला भगिनींना , तरुण – तरुणींना केले आहे .
- Advertisment -

You cannot copy content of this page