![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
वंचित कर्जत ता.अध्यक्ष धर्मेंद्रदादा मोरे यांनी केला सरकारचा जाहीर निषेध…
भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) ऐन दिवाळीत जाहीर केलेले गोरगरीब कुटुंबांसाठी दिवाळी साजरी करण्यासाठी रेशन दुकानातून मिळणारे साहित्य दिवाळी संपून गेली तरी साहित्य न आल्याने गोरगरिबांची दिवाळी अंधारात जाऊन कोरडी साजरी करावी लागली .गोरगरीबांना ” आनंदा शिदा ” न मिळणे हि चक्क सरकारने गोरगरीबांची केलेली चेष्टा आहे. यासंदर्भात कर्जतमध्ये वंचित बहुजन आघाडीचे कर्जत तालुका अध्यक्ष धर्मेंद्रदादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारचा जाहीर निषेध आंदोलन आज दि. २७ ऑक्टोबर २०२२ रोजी कर्जत पोस्ट कार्यालय समोर करण्यात आला.
राज्यातील सामान्य जनतेची दिवाळी गोड करण्याकरीता सरकारने १०० रुपयांत चार वस्तु देण्याचा त्यात एक लिटर तेल, एक किलो रवा, साखर आणि चणाडाळ देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाची अद्यापही अंमलबजावणी सुरू झालेली दिसत नाही. स्वस्त धान्य दुकानात गोरगरीब सामान्य नागरिक जाऊन सरकारने घोषणा केलेल्या वस्तु आल्यात का? असे विचारत आहे. त्यात अद्यापही या वस्तु न आल्याचे कळताच नागरिक नाराजी व्यक्त करत असून रिकाम्या हाती घराकडे परतत आहे.
स्वस्त धान्य दुकानदारांनाही याबबात कुठलीही कल्पना नसल्याने दिवाळी गोड करण्याबाबत आलेल्या निर्णयाची कुठलीही स्पष्टता होत नाहीये. त्यामुळे सरकारने सामान्य नागरिकांसाठी घेतलेला निर्णय कागदावरच राहिला आहे.राजकीय व शासकीय अनास्थामुळे सरकारची हि घोषणा कागदावरच राहिली आहे.
या गंभीर बाबीचा वंचित बहुजन आघाडीतर्फे कर्जत तहसीलदार शीतल रसाळ यांना निवेदन दि. २१ तारखेला देऊनही कर्जत तहसीलदार गोरगरिबांची दिवाळी हिरावून कुठलीच यंत्रणा न हलवता स्वतः दिवाळी साजरी करत बसले , आज त्यांची भेट झाली नसल्याने दिवाळीचे महत्वाचे दिवस संपले तरी सरकारने जाहिर केलेले साहित्य न मिळाल्यामुळे आज कर्जत पोस्ट ऑफीस समोर वंचित बहुजन आघाडी चे वतीने राज्य सरकारचा गरिबांची चेष्टा केल्याबददल जाहीर निषेध करण्यात आला.
” आंनद शिदा ” ही योजना म्हणजे गरीब जनतेच्या तोंडाला पुसलेली पाने असून राजकीय व शासकीय अनास्थामुळेच गोरगरिबांच्या घरातील दिवाळी कोरडी झाल्याचे मत वंचितचे कर्जत ता.अध्यक्ष धर्मेंद्रदादा मोरे यांनी व्यक्त करत राज्य शासनाच्या गलथान कारभाराचा जाहीर निषेध केला . कर्जत तहसिलदार शीतल रसाळ यांची पुन्हा भेट घेऊन त्यांना लवकरात लवकर दिवाळी रेशनिंग वाटप करणेची मागणी करणार आहेत.
सदरील आंदोलन करताना वंचित बहुजन आघाडी कर्जत तालुका अध्यक्ष धर्मेंद्रदादा मोरे , जिल्हा उपाध्यक्ष हरिचंद्र यादव, जिल्हा सचिव अनिल गवळे, जिल्हा संघटक सुनील आप्पा गायकवाड, शहर अध्यक्ष लोकेश यादव, शैलेश खोब्रागडे,सचिव प्रदीप गायकवाड, तालुका उपाध्यक्ष निलेश पवार , विकी जाधव, शरद गायकवाड, कमलाकर जाधव, धनवे काका, मधुकर जाधव , सुनील मोरे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.