![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) इतिहास काळापासून स्त्री शक्तीचं रूप सर्वांनाच पहायला मिळाले आहे .स्त्री शक्ती काय घडवू शकते हे ” जिजाऊ मातेच्या ” रूपाने आपण अनुभवले आहे .जिजाऊ मातेने ” छत्रपतींना ” घडविले तर छत्रपतींनी ” स्वराज्य ” घडविले , तसेच अनंत अडचणींवर मात करून चूल आणि मुल यांच्या जोखडातून स्त्रियांना शिक्षण रुपी कवच कुंडले देवून स्त्री मुक्तीची कवाडे उघडून इतिहास रचणाऱ्या ” स्त्री शिक्षणाच्या उद्धारक सावित्रीबाई फुले ” यांचे उपकार या आधुनिकतेच्या उंबरठ्यावर असलेल्या कुठल्याच महिला फेडू शकत नाहीत . हिच प्रेरणा घेऊन कर्जत तालुक्यातील पळसदरी या छोट्याशा गावातून उदयास आलेली ” राजमाता जिजाऊ फाउंडेशनने ” समाजात गोरगरीब , महिलावर्ग , विद्यार्थी यांच्यासाठी विविध कार्य करून समाजसेवेचे खारीचा वाटा उचलत असताना दिसत आहेत.
या संस्थेच्या अध्यक्षा सौ.ऍड. पूजा सुर्वे यांनी राजमाता जिजाऊ फाऊंडेशन च्या माध्यमातून , जिजाऊ मातेच्या आशीर्वादाने व छत्रपतींच्या प्रेरणेने समाजसेवेचे बळ घेऊन , आपणही या समाजाचे काही देणे आहोत , हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून गोरगरीब , पिडीत समाजासाठी काम करत आहेत .महापुरुषांच्या जयंती साजरी करून स्त्रियांना बल व स्फूर्ती देवून घडविण्याचे महान कार्य करत आहेत.
आज पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व शाळांमध्ये ” राजमाता जिजाऊ फाऊंडेशन ” तर्फे ३ जानेवारी २०२४ रोजी ” सावित्रीबाई फुले ” यांच्या जयंती निमित्त निबंध स्पर्धा अणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी सौ. ॲड. पुजा सुर्वे यांनी मुलांना अणि मुलींना मार्गदर्शन केले अणि स्त्री उद्घारक ” सावित्रीबाई फुले ” यांचे स्त्रियांच्या प्रती केलेल्या योगदाना बद्दल माहिती दिली , तसेच भाषण अणि निबंध स्पर्धा आयोजित केलेल्या विजेते मुला – मुलींना रोख रक्कम बक्षीस अणि प्रशस्तीपत्रक देवून सन्मानित करून प्रोत्साहित केले.
यावेळी सर्व शाळांमधील शिक्षक आणि शिक्षिका यांनी ” राजमाता जिजाऊ फाऊंडेशन ” च्या स्तुत्य उपक्रमाबाबत कौतुक अणि अभिनंदन केले .सदर कार्यक्रमास राजमाता जिजाऊ फाऊंडेशन च्या अध्यक्षा मा. सौ . ॲड. पुजा सुर्वे अणि त्यांच्या समवेत सहकारी सदस्या वर्षा पवार , सुवर्णा सुर्वे , मेधा राउत , मनिषा पवार , कांचन देशमुख , पंकेश जाधव , गणेश पिरकर व गावातील अनेक महिला भगिनी उपस्थित होत्या . महिलांनी आजच्या या युगात स्वावलंबी होणे गरजेचे असल्याने पळसदरी हद्दीतील अनेक महिलांना बचत गट स्थापन करून त्यांना रोजगार उपलब्ध करून त्यांना स्वताच्या पायावर उभे रहाण्याचे धाडस राजमाता फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ.पूजा सुर्वे यांनी केले आहे.
निराधारांना पेन्शन , कोरोना काळात अन्न – धान्य वाटप , गावांत सुविधा , गावातील नागरी समस्यांचे निराकारण ते धडाडीने करत आहेत .तर राजकीय क्षेत्रात देखील त्या धडाडीने काम करत आहेत . या त्यांच्या विशेष कार्याचे नेहमीच कौतुक होत असते.