if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यातील नदी पात्रातील झालेली अतिक्रमणे व बेकायदेशीर बांधकामे हे येथील प्रशासन व राजकीय नेते , सर्व संघटना मान्य करत असताना , यावर कारवाई का होत नाही , म्हणजेच कारवाईचे आश्वासन देवून उपोषण सोडवायचे व नंतर लक्ष न देण्याच्या या भूमिकेवर पोलीस मित्र संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुनील पाटील हे आक्रमक झाले असून राजकीय नेते व प्रशासनाचे अधिकारी मिळून कर्जत खालापूर तालुक्यातील नागरिकांची घोर फसवणूक करत असून आमच्या संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश दादा कदम यांनी म्हणूनच या संदर्भात आजचे हे तिसरे आमरण उपोषण करत असून त्यांनी घेतलेला जल समाधीचा हा टोकाचा पर्याय आम्ही घेवू देणार नसून यावर न्याय देवून प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडू , असे आज कर्जतमध्ये लोकमान्य टिळक चौकात उपोषणकर्ते रमेश दादा कदम यांच्या उपोषणाला भेट देवून मत व्यक्त केले.
पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश दादा कदम यांचे कर्जत खालापूर तालुक्यातील नदी पात्रातील बेकायदेशीर बांधकामामुळे येतील परिसरातील नागरिकांचा पुराच्या पाण्यामुळे जीव धोक्यात येत असल्याने या संदर्भात एक वर्षापूर्वी आमरण उपोषण सुरू केले होते , आजचे हे त्यांचे तिसरे आमरण उपोषण व जल समाधी आंदोलन आहे . यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष दादा चौधरी यांनी भेट देवून येथील राजकीय नेते व प्रशासन यांच्यावर भडिमार करत ” भावी आमदार ” म्हणवून मिरवणारे यांनी येथील जनतेला पुराच्या पाण्यापासून जीव वाचविण्यासाठी कारवाई करण्यासाठी या उपोषणाला पाठींबा देवून प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडून आम्ही जनतेच्या बरोबर आहोत , हे दाखवून द्यावे , असे आवाहन करत संपूर्ण पोलीस मित्र संघटना प्रदेश उपाध्यक्ष रमेश दादा कदम यांच्या पाठीशी ठाम असून त्यांना जल समाधी घेवू देणार नाही , तर न्याय मिळवून देवू , असे मत व्यक्त केले.
तर उपोषणकर्ते पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश दादा कदम यांनी नदी पात्रातील अतिक्रमण व बेकायदेशीर बांधकामे तोडण्यास येथील राजकीय नेते आश्वासन देवून पाठ फिरवत असून आमच्या मागण्यांसाठी शासकीय अधिकाऱ्यांची पाठ राखण करत असून यावेळी हि लढाई आरपारची असून यावर कारवाई होण्यासाठी मला ” जल समाधी ” घेण्याशिवाय पर्याय नाही , असे मत व्यक्त केले . त्यामुळे आजच्या या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे हे आंदोलन पेटणार असून कर्जत तहसीलदार शीतल रसाळ व पाटबंधारे विभागाचे उपअभियंता गुंटूरकर काय भूमिका घेतात ? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.