![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
लोणावळा (प्रतिनिधी): राज्यस्तरिय तायक्वांडो स्पर्धेत तायक्वोंडो टायगर अकॅडमी च्या विध्यार्थ्यांनी 10 सुवर्ण पदकं,12 रजत पदकं तर 2 कांस्य पदकं मिळवून नेत्रदिपक यश संपादन केले आहे. तायक्वांडो टायगर अकॅडमीचे मास्टर विजय पी. अगरवाल व मास्टर अयुब खान यांच्या मार्गदर्शनाखाली हे विध्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत.
शेतकरी समाज हॉल, कोपरखैरणे, नवी मुंबई येथे दि.29/10/2023 रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय तायक्वोंडो स्पर्धेत अकॅडमीच्या विध्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले आहे.
पदक व विध्यार्थ्यांची नावे अनुक्रमे कु.तनिष्का प्रविण येवले (सुवर्ण पदक ), कू.चैतन्य तुशार विकारी (सुवर्ण),कू.रोशन अर्जुन अहेर(सुवर्ण),कू.वेदांत संजय देशमुख(सुवर्ण), कु. संस्कृती संजय देशमुख(सुवर्ण),कू. अथर्व नारायण मावकर (सुवर्ण),कू. सार्थक संतोष वावरे (सुवर्ण),कू. युवराज संदीप पिलाने(सुवर्ण),ईश्वरी संजय येवले(सुवर्ण) इत्यादी दहा विध्यार्थ्यांनी सुवर्ण पदक मिळविली तर कू.सिद्धेश महेंद्र देशमुख, कू.पवन शंकर उगले कु.सानवी जालिंदर पिंगळे कु.तनवी जालिंदर पिंगळे, आदया मोहन रेज्जी, कु. स्वराली अशोक भेगडे, कू.यश रामनाथ जाधव, कू.महारूद्र हरिविजय देशमुख,कू.विघ्नेश योगेश पडवळ,कू.विघ्नेश बालकृष्ण मावकर,कू.शिवराज संतोष मावकर, कू.साहिल लहु चव्हान अशी बारा रजत पदक मिळविलेल्या विध्यार्थ्यांची नावे आहेत. त्याचबरोबर कू.आयुष नारायण मावकर,कू. दुष्यन्त बालकृष्ण मावकर यांनी कांस्य पदक मिळवून आपल्या अकॅडमी चे नाव लौकिक केले आहे. सर्व विध्यार्थ्यांच्या कलाकौशल्याने सर्वांची मने जिंकली असून मावळातून सर्व स्तरातून यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.