if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
मुंबई: राज्यातील पोलीस बांधवांना दिवाळी बोनस देण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमित राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रामार्फत विनंती केली आहे.
त्यात त्यांनी पोलीस बांधवांविषयी म्हटले की महाराष्ट्रातील कायदा – सुव्यवस्थेची जबाबदारी राखण्यात आपले पोलीस बांधव दिवस – रात्र एक करतात . तुमच्या माझ्यासह राज्यातील सर्व नागरिक सणासुदीच्या दिवसांत सुट्टी घेऊन कुटुंबीय तसेच मित्रमंडळीसह जे काही आनंदाचे क्षण अनुभवतात , ते याच पोलिस बांधवांच्या अविरत,सुरक्षा सेवेमुळे अतिमहत्वाची शासकीय सेवा नोकरी म्हणून पोलीस बांधव ना युनियन करू शकतात , ना इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना पाच दिवसांचा आठवडा असतो , ना त्यांना पुरेशा सुट्टया मिळतात.
कामाचे तास तर सर्वात जास्त 12 ते 15 तास ! पोलीस बांधवांच्याच म्हणण्यानुसार , इतर शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा त्यांना एका वर्षात तब्बल 76 दिवस अतिरिक्त काम करावे लागते ! हे सगळं आज सांगण्याचं कारण इतकंच की , पुढच्या आठवड्यात दिवाळी साजरी करताना आपल्या प्रत्येकाच्या घरात जेव्हा कंदील आणि पणत्या लागतील , तेव्हा पोलीस बांधव डोळ्यात तेल घालून गस्त देत असतील, फटाके वाजवताना कुठे कुणी लहान मुलगा भाजला तर त्याला रुग्णालयात दाखल करत असतील.पोलीस बांधव हा आपल्या प्रमाणे सामान्य माणूस असून त्याची कामगिरी आपल्याहून वेगळीच आहे.
त्यांच्या कुटुंबीयांनाही आपल्या माणसाबरोबर दिवाळी साजरी करावीशी वाटत असेल , हे एक समाज म्हणून आपण विसरूनच गेलोय . माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे की , गेल्या अनेक वर्षांपासूनचा चुकीचा सरकारी पायंडा मोडून पुन्हा एकदा पोलिसांना एक पगार दिवाळी बोनस म्हणून देण्यास सुरुवात करावी . पोलीस बांधवांची यंदाची दिवाळी गोड करावी अशी विनंती करण्यात आली आहे.