कर्जत विधानसभा मतदार संघात रामदास कदम यांच्या बेताल वक्तव्यामुळे शिवसेना – भाजपात पडणार दरी ?
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कोकणातील रस्ते पन्नास वर्षात तीन वेळा मंत्री होवूनही शिवसेनेचे रामदास कदम यांना जमल नाही ते भाजप चे सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांनी करून दाखविले , याची ” पोटशूळ ” उठल्याने त्यांच्याविरोधात बेताल वक्तव्ये करून आपली ” लायकी ” काय हे दाखवल्याने संतप्त झालेले कर्जत विधानसभा अध्यक्ष किरण भाऊ ठाकरे यांनी रामदास कदम यांच्या बेताल वक्तव्याचा चांगलाच समाचार कर्जत भाजपाच्या वतीने केलेल्या ” जोडे मारों ” आंदोलनात घेतला . यावेळी त्यांनी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणारे रामदास कदम यांचा जाहीर निषेध करत कोकणातील रस्त्यांची स्वतः पाहणी करणारे रविंद्र चव्हाण ” देशातील पहिले मंत्री ” असल्याचे गौरोद्गार देखील भाजप विधानसभा अध्यक्ष किरण भाऊ ठाकरे यांनी काढले . यावेळी संतप्त झालेली भाजप रस्त्यावर उतरून तीव्र व क्रोध व्यक्त करून आंदोलन केल्याने शिवसेना व भाजप यांच्यात भविष्यात तेढ निर्माण होण्याची चिन्हं दिसत आहेत.
मुंबई – गोवा हा कोकणात जाणारा रस्ता गेली अनेक वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे . कोकणातील बांधवांना प्रवास करण्यासाठी सुस्थितीत रस्ते व्हावे म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिवसरात्र विशेष लक्ष देवून रस्त्याची स्थिती सुधारली आहे , तर येथील नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत , त्या सोडविल्याने भाजपाचे जनाधार वाढल्याने शिवसेनेचे कोकणातील नेते रामदास कदम यांच्या अस्तित्वाला धोका पोहचला . तीन वेळा मंत्री व गेली ५० वर्षे सत्ता भोगणारे रामदास कदम यांना जे जमले नाही ते कोकणचे भाग्य विधाते मंत्री रविंद्र चव्हाण यांनी करून दाखविल्याने जळफळाट झाल्याने रामदास कदम यांनी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करत त्यांचा ” राजीनामा ” मागितल्याने रायगड सहित कर्जत तालुक्यात देखील त्याचे पडसाद उमटून भाजप पदाधिकारी संतप्त होवून रस्त्यावर उतरले . रामदास कदम यांचा निषेध व्यक्त करत , त्यांच्या नावाने ” हाय हाय ” करत त्यांच्या फोटोला ” जोडे मांरो ” आंदोलन केले.
यावेळी हे संतप्त आंदोलन कर्जत विधानसभा अध्यक्ष किरण भाऊ ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले , यांत माजी आमदार सुरेश भाऊ लाड , जिल्हा उपाध्यक्ष वसंत शेठ भोईर , जिल्हा चिटणीस दिपक बेहेरे , किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे , ता. अध्यक्ष राजेश भगत , मंगेश म्हसकर , मा. उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल , शहर अध्यक्षा शर्वरी कांबळे , वसंत महाडिक , बिनिता घुमरे , विजय जिनगिरे , त्याचप्रमाणे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बेताल वक्तव्य करून चुकीच्या वल्गना केल्यास भाजप कर्जत सहित सर्व कोकणात उमेदवार उभे करून ताकदीनिशी लढेल व विजयी होईल , असा इशारा यावेळी किरण भाऊ ठाकरे यांनी शिवसेनेला दिला आहे . यावेळी मा. आमदार सुरेश भाऊ लाड , सुनील गोगटे , दिपक बेहेरे , राजेश भगत , ऋषिकेश जोशी , यांनी देखील संतप्त आक्रमक प्रतिक्रिया देत रामदास कदम यांचा निषेध व्यक्त केला.