if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
आमदार भरत शेठ गोगावले की आदिती ताई तटकरे प्रश्नचिन्ह कायम..
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार मात्र रायगडचे पालकमंत्री पदाचा तिढा सुटता सुटत नसून महाडचे आमदार भरत शेठ गोगावले की रोहा माणगावच्या आमदार तथा महिला व बाल कल्याणमंत्री आदिती ताई तटकरे होणार , यावर अद्यापी प्रश्नचिन्ह कायम असून या तिढ्यावरच रायगडचे पुढील राजकारण घोंघावणार असल्याने यामुळे राजकीय वादळ उठण्याचे चिन्ह मात्र दिसत आहेत .
रायगडात शिवसेनेचे ३ आमदार आहेत . महाडचे आमदार भरत शेठ गोगावले , अलिबागचे आमदार महेंद्र दळवी तर कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र शेठ थोरवे अशी ३ आमदारांची प्रचंड शक्ती असल्यानेच यापूर्वीची शिवसेना – राष्ट्रवादीची सत्ता असताना १ आमदार असलेल्या राष्ट्रवादीला पालकमंत्री पद आदिती ताई तटकरे यांच्या रूपाने मिळाले होते . म्हणूनच त्यांचे पालकमंत्री पद उलथवून टाकण्याचा प्रारंभ या रायगडच्या ३ आमदारांनी घेवून संपूर्ण राज्याचीच सत्ता उलथून टाकली.
मात्र पुन्हा सूत्र बदलून राज्याच्या मुख्यमंत्री पदी शिवसेनेचे मा. एकनाथ शिंदे साहेब बसल्यावर रायगडचे पालकमंत्री पद ज्येष्ठ आमदार तथा पक्ष प्रतोद भरत शेठ गोगावले यांनाच मिळणार , यावर शिक्कमोर्तब होणार होते .परंतु आता ३ महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून अजित दादा पवार गट शिवसेना – भाजपा सत्तेत सामील झाल्याने रायगडचे खासदार सुनील तटकरे व त्यांची कन्या आमदार आदिती ताई तटकरे हे देखील अजित दादा पवार गटात जाऊन ते पक्षाचे प्रदेश अध्यक्ष व आदिती ताई तटकरे या महिला व बाल कल्याण मंत्री झाल्या आहेत.
त्यामुळे आता रायगडचे पालकमंत्री पदावर दोन्ही पक्ष दावा करत असल्याने या पदावर रायगडचे राजकारण घुमणार असून , कोण कमीपणा घेणार ? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे .रायगडचे खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे यांची या पालकमंत्री पदामुळे प्रतिष्ठा पणाला लागली असून , दुसरीकडे ज्या गोष्टीला विरोध करून ठाकरे शिवसेना सोडुन शिवसेना एकनाथ शिंदे गटात सामील झालो त्यामुळे या ३ मात्तब्बर आमदार मधील ज्येष्ठ आमदार भरत शेठ गोगावले यांना पालकमंत्री पद न मिळाल्यास , ते काय भूमिका घेतात , याकडे संपूर्ण रायगडचे लक्ष लागून आहे.
मात्र या लढाईत ” जो जिता वो ही..सिकंदर ठरणार ” हे ही तितकेच सत्य आहे.सुधारित ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे – पुणे – अजित दादा पवार , अकोला – राधाकृष्ण विखे- पाटील ,सोलापूर – चंद्रकांत दादा पाटील ,अमरावती – चंद्रकांत दादा पाटील ,भंडारा – विजयकुमार गावित ,बुलढाणा – दिलीप वळसे-पाटील ,कोल्हापूर – हसन मुश्रीफ , गोंदिया – धर्मरावबाबा आत्राम , बीड – धनंजय मुंडे , परभणी – संजय बनसोडे , नंदूरबार – अनिल भा. पाटील , वर्धा – सुधीर मुनगंटीवार यांची नियुक्ती पालकमंत्री पदावर झाली आहे.