खोपोलित काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा संपन्न,अनेक तरुणांनी केला काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश …..
खोपोली- दत्तात्रय शेडगे
रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या संघटन वाढीसाठी जोरदार प्रयत्न करणार असल्याचे प्रयत्न प्रतिपादन काँगेसचे रायगड जिल्हाध्यक्ष माणिक जगताप यांनी केले,ते माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले यांच्या ९२ व्या जयंती निमित्ताने काँग्रेसचा कर्जत खालापूर मतदार संघाचा कार्यकर्ता आयोजित मेळाव्यात खोपोली येथे बोलत होते.
रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले यांनी काँग्रेस पक्ष वाढीसाठी जोरदार प्रयत्न केले असून रायगडात अनेक उधोग धंदे आणले मात्र त्यांच्या या रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला लागलेली उतरती कळा, यामुळे काँगेस पक्ष रायगडात जिल्हात संपण्याच्या मार्गावर आहे, यासाठी आजपासून रायगड जिल्हात काँग्रेस पक्षाची संघटना वाढवून काँग्रेस उभारणी साठी जोरदार प्रयत्न करणार असल्याचे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माणिक जगताप यांनी सांगितले तर यावेळी खोपोली शहरातील अनेक तरुणांनी कॉग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी महाराष्ट्र काँगेस उपाध्यक्ष तथा रायगड जिल्हाध्यक्ष माणिकराव जगताप, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटी अशोक मुंडे, कामगार नेते महेंद्र घरत, रायगड जिल्हा काँग्रस युवक अध्यक्ष प्रथमेश पाटील, रायगड जिल्हा महिला अध्यक्षा ऍड श्रद्धा ठाकूर, माजी सभापती कांचन पारंगे, खालापूर तालुका अध्यक्ष नाना म्हात्रे, माथेरान शहर अध्यक्ष मनोज खेडेकर, कर्जत तालुका अध्यक्ष मुकेश सुर्वे, कर्जत तालुका महिला अध्यक्षा दीपाली म्हात्रे, इंटक उपाध्यक्ष अमीर खान, खोपोली शहर अध्यक्ष रिचर्ड जॉन, उपाध्यक्ष निवृत्ती मोरे, युवक अध्यक्ष संदेश धावारे, महिला अध्यक्षा रेखा जाधव, रायगड महिला जिल्हा सरचिटणीस सुनीती पाटील, कमलाकर शेडगे, नागेश शेठ, अरुण गायकवाड, उस्मान खोत, जीलानी इब्राहिम शेख आदीसह अनेक काँग्रेसचे ककार्तकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते