Friday, July 4, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडरायगड पोलादपूर येथे मुंबई गोवा महार्गावर बस व कारचा भीषण अपघात, दोघांचा...

रायगड पोलादपूर येथे मुंबई गोवा महार्गावर बस व कारचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू…

रायगड(प्रतिनिधी) : मुंबई – गोवा महामार्गावर रायगड पोलादपूर येथे शिवशाही बस व एर्टिका कारचा भीषण अपघात होऊन कार मधील दोघांचा मृत्यू झाला.
आज सकाळी 9:15 च्या सुमारास मुंबई – गोवा महामार्गावर रायगड पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयाजवळ हा अपघात झाला.
अपघातात एर्टिका कार मधील जयवंत सावंत ( वय 60, रा. अंबरनाथ ) व किरण घागे ( वय 28, रा. घाटकोपर ) यांचा मृत्यू झाला असून कार मधील इतर गिरीष सावंत ( वय 34, अंबरनाथ ), अमित भितळे ( वय 30, रा. बदलापूर ), जयश्री सावंत ( वय 56, रा. अंबरनाथ ) हे तिघे जण जखमी झाले आहेत.
जखमींवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कामोठे येथील एमजिएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page