रायगड : गेल्या दोन दिवसात कोकणात पावसाने दमदार हजेरी लावली आहे . तर अद्याप देखील पाऊस सुरु आहे.दक्षिण कोकण आणि गोवा या भागात पाऊस आणि काही ठिकाणी अतिवृष्टी म्हणजे 200 मीलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे . रत्नागिरीतील अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरुन वाहू लागल्या आहेत.तर पुढील आणखी काही तास मध्यम ते तीव्र सरींची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.तर आंबा , सावित्री , पाताळगंगा , ओल्हास आणि गाढी या नद्या आता धोक्याच्या पातळीपेक्षा थोड्या कमी आहेत . याशिवाय जगबुडी , काजळी नदीचं पाणी इशारा पातळीवरुन वाहु लागलं आहे . रायगड , रत्नागिरी या भागात होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खबरदारीचे निर्देश दिले आहेत . या ठिकाणच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हालवणे आणि कोणतीही जीवित हानी होऊ न देण्याची काळजी घेण्याचं अवाहन देखील करण्यात आलं आहे.तर या पार्श्वभूमीवर राज्यात आता NDRF ची 8 पथक तैनात ठेवण्यात आली आहेत.