![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळा शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस आयोजित दहीहंडी उत्सवाची दहीहंडी जाखमाता गोविंदा पथक तुंगार्ली यांनी फोडत पाच फुटाच्या आकर्षक चषकाचा मान मिळविला आहे.
लोणावळा शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून लोणावळा शहरामध्ये यावर्षी जयचंद चौक या ठिकाणी भव्य स्वरूपात दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या ठिकाणी गोविंदा पथकांना 9,99,999/- रुपयांची सामायिक बक्षिसे वाटप करण्यात आली.मानवी मनोरे रचताना सर्वात उंचावर असणाऱ्या गोविंदा पथकाला दुखापत होऊ नये याकरिता या ठिकाणी सेफ्टी बेल्टचा वापर करण्यात आला होता. तसेच सर्वात वरती असणाऱ्या गोविंदाला मेडल,चषक व रोख बक्षीस देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस मंजुश्री वाघ,लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विलास बडेकर, कार्याध्यक्ष रवी पोटफोडे, लोणावळा शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष विनोद होगले, महाराष्ट्राचे प्रांतिक सदस्य बाळासाहेब पायगुडे, धनंजय काळोखे,प्रसिद्ध उद्योजक नंदकुमार(बाबूजी) वाळंज यांसह उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते दहीहंडी चे पूजन करत दहीहंडी महोत्सवाला सुरुवात करण्यात आली.
लोणावळा शहरातील 16 व मुंबई भागातील 30 गोविंदा पथकांनी या ठिकाणी दुपारपासून रात्री उशिरापर्यंत हजेरी लावत पाच व सहा थरांच्या सलाम्या दिल्या. प्रत्येक संघाला सलामीसाठी अनुक्रमे पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले. अतिशय उत्साह पूर्ण वातावरणामध्ये हा महोत्सव साजरा करण्यात आला. सदस्य बाळासाहेब पायगुडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सेलचे अध्यक्ष व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या दहीहंडी महोत्सवात व नियोजनात सहभागी झाले होते.
तर मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके तसेच स्टोरी ऑफ लागीर फेम अभिनेत्री स्नेहल बोंग,चला हवा येऊ द्या या जगप्रसिद्ध शो मधील कलाकार चैताली मानकर, मॉडेल व अॅक्टर श्रावणी पटेल,कास्टिंग डायरेक्ट अक्षय खिरीड या कलावंतांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर हजेरी लावत गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला. सर्व गोविंदा पथक व दहीहंडी पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.