![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
प्रदेश अध्यक्ष खासदार ” सुनील तटकरे ” साहेबांनी केली घोषणा…
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ” रायगड जिल्हाध्यक्ष पदी राजिप चे मा. उपाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे ” यांची नियुक्ती नुकतीच प्रदेशाध्यक्ष खासदार ” सुनील तटकरे साहेब ” यांनी सुतारवाडी येथे झालेल्या बैठकीत केली . ” कोकणचे भाग्य विधाते ” खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची सभा पार पडली. या सभेत हि घोषणा करण्यात आली.
विशेष म्हणजे एक महिन्यापूर्वी सुधाकर भाऊ घारे यांची ” कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघ अध्यक्ष पदी ” नियुक्ती केलेली असताना एक महिन्याच्या आतच ” रायगड जिल्हाध्यक्ष ” पदाची केलेली नियुक्ती राजकीय पटलावर चर्चेचा विषय होत आहे . प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी विधानसभेच्या अध्यक्ष पदाची नियुक्ती करताना रायगड जिल्हाध्यक्ष पदाची ऑफर सुधाकर भाऊ घारे यांना केली असता , मला विधानसभेच्या निवडणुकीत माझ्या पाठीशी ठाम उभे राहणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सोबत राहायचे आहे , त्यांची ताकद बनायची आहे , असे उत्तर त्यावेळी सुधाकर भाऊ घारे यांनी दिलेले भाषणात व्यक्त केलेले असताना अचानक अस काय घडलं ? असा प्रश्न आता सर्वत्र दबक्या आवाजात ” चर्चा ” होताना दिसत आहे . जिल्ह्याची जबाबदारी दिल्यावर ते आपल्या मतदार संघात जास्त वेळ देऊ शकतील का ? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
राज्यात जरी महायुतीत शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – भाजप एकत्रित असली तरी कर्जत खालापूर मतदार संघात पूर्वापार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी ” साप x मुंगुस ” असे वैर पहाण्यास मिळाले आहे . शिवसेनेचे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे यापूर्वी माजी आमदार सुरेश भाऊ लाड तर आता मा. राजिप उपाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे असे राजकीय वैर पहाण्यास मिळत असताना विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीत राष्ट्रवादी असल्याने उमेदवारी न मिळाल्याने सुधाकर भाऊ घारे यांनी अपक्ष उमेदवारी लढवली होती . मात्र पराभव झाल्याने हे वैर आता या ८ महिन्यांत अधिक तीव्र दिसत असल्याने या मतदार संघात होत असलेल्या ” राजकीय घडामोडी ” खूपच अर्थपूर्ण असून सुधाकर भाऊ घारे यांची एकाच महिन्यात केलेल्या बढतीत काय राजकारण दडलेले आहे ? हे येणारा काळच दाखवणार आहे.
राजिप चे मा. उपाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांचा ” राजकीय आलेख उंचावत ” असल्याने त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रायगड जिल्हाध्यक्ष पदी झालेल्या निवडीमुळे त्यांच्यावर कर्जत खालापूर मतदार संघ व रायगड जिल्ह्यातून सर्व स्तरातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा ” अभिनंदनाचा व शुभेच्छांचा ” वर्षाव होत आहे .