Friday, January 3, 2025
Homeपुणेमुळशीराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुळशी महिला तालुका अध्यक्ष पदी दीपाली विनायक कोकरे यांची...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुळशी महिला तालुका अध्यक्ष पदी दीपाली विनायक कोकरे यांची फेरनिवड…

खोपोली- (दत्तात्रय शेडगे)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुळशी महिला तालुकाध्यक्ष पदी दीपाली विनायक कोकरे यांची फेरनिवड करण्यात आली,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा नुकताच पार पडला यावेळी वांद्रे ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुळशी महिला तालुकाध्यक्षा असलेल्या दीपाली कोकरे यांची पुन्हा एकदा फेरनिवड करण्यात आली, त्यांना निवडीचे पत्र खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते देण्यात आले.


दीपाली कोकरे ह्या तालुक्यातील वांद्रे ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच असून त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महिला सक्षमीकरन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळातील सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवून गोर गरिबांना न्याय देण्याचे प्रामाणिक पर्यंत करीत आहेत तर मागील काळात महिलांचे संघटन खूप चांगल्या प्रकारे करून लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूकीच्या वेळी अतिशय शिस्तबद्ध प्रचार करून पक्ष संघटना वाढीसाठी जोरदार प्रयत्न केले.


त्यांच्याच या कार्याची पक्षाने दखल घेत पुन्हा त्यांना संसदरत्न ,खासदार सुप्रिया सुळे जिल्हा अध्यक्षा भारतीताई शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला मुळशी तालुका अध्यक्ष पदी फेरनिवड करण्यात आली, त्याची निवड होताच सर्वच स्तरातुन त्यांचे कौतुक करून अभिनंदन होत आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page