Sunday, August 3, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवशाही युवा प्रतिष्ठाण तर्फे शरीर सौष्ठव स्पर्धेचे डीकसळ...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवशाही युवा प्रतिष्ठाण तर्फे शरीर सौष्ठव स्पर्धेचे डीकसळ येथे आयोजन !

कर्जत तालुका युवक अध्यक्ष सागरभाऊ शेळके यांचा स्तुत्य उपक्रम…

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच कमावलेलं शरीर दाखवून वाहवा मिळविण्याच्या हेतूने शरीर सौष्ठव स्पर्धकांसाठी सुवर्णसंधी मिळावी , या उद्दात हेतूने राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे कर्जत तालुका अध्यक्ष तसेच शिवशाही युवा प्रतिष्ठाण चे सर्वेसर्वा सागरभाऊ शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ” सागरभाऊ शेळके श्री सौष्ठव स्पर्धा – २०२२ ” प्रतिक्षा फार्म व लॉन्स डीकसळ , तालुका कर्जत येथे ११ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आल्या आहेत.
कर्जत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष व शिवशाही युवा प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे डिस्ट्रिक् यांच्या मान्यतेने कर्जत तालुका मर्यादित शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
यामध्ये विजेत्यांना रोख ११ हजार रुपयांचे पारितोषिक व आकर्षक चषक यामध्ये एकंदरीत पाच वजनी गट असतील ५५ – ६० – ६५ – ७० व ७० प्लस किलो वरील खुला गट यामध्ये पहिले पारितोषिक ३ हजार , दुसरे पारितोषिक अडीच हजार , तिसरे पारितोषिक दोन हजार , चौथे पारितोषिक दिड हजार , पाचवे पारितोषिक एक हजार असे पारितोषिक व स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकास आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार आहे .बेस्ट पोझर ला ३०००/- व आकर्षक चषक , यासाठी संपर्क – कैलास वाघ सर – 7276557331/ 779605 6127 व सचिन कांबरी सर – 9359016120 या क्रमांकावर स्पर्धकांनी संपर्क करण्याचे आवाहन मुख्य आयोजक सागरभाऊ शेळके यांनी केले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page