Thursday, November 21, 2024
Homeपुणेकामशेतराष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस कामशेत शहर व एस एस फूड्स आयोजित आरोग्य शिबिराचा...

राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस कामशेत शहर व एस एस फूड्स आयोजित आरोग्य शिबिराचा 268 नागरिकांनी घेतला लाभ…

कामशेत(प्रतिनिधी) : सशक्त व समर्थ भारत निर्मितीसाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कामशेत शहर व एस एस फुड्स यांच्या संयुक्त विद्यमानाने कामशेत शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये 268 नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतल्याची माहिती आयोजक सुरज पुरी यांनी दिली.

तर प्राथमिक तपासणीमध्ये 8 जणांना मोतीबिंदूचे निदान झाले असून येणाऱ्या काळामध्ये त्यांची शस्त्रक्रिया करणार असल्याचे संकेत राणे यांनी सांगितले.शहरातील युग क्लिनिकमध्ये रक्तदाब तपासणी मधुमेह तपासणी नेत्र तपासणी व धनुर्वाद लसीकरण आदींसह विविध आजारांवर मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी आमदार सुनील शेळके , राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गणेश खांडगे , विठ्ठल शिंदे , किशोर सातकर , आनंद टाटिया , तानाजी दाभाडे , सुरेश वघावले , गजानन शिंदे , निलेश दाभाडे , मीनाक्षी वाळुंज , कल्याणी काजळे , गणेश राणे , रुपेश गायकवाड , वैशाली इंगवले , साई बालगुडे आदींनी शिबिराला भेट दिली.

संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल काळे , रोशन आंद्रे , प्रतिक गाडे , दिनेश भानुसघरे , सिद्धार्थ भालेराव , नितीन गायकवाड यांनी विशेष मेहनत घेतली तर डॉ. पल्लवी बालगुडे यांचे विशेष सहकार्य लाभले .

- Advertisment -

You cannot copy content of this page