(खोपोली- दत्तात्रय शेडगे)
राष्ट्रीय समाज पक्षाच्या मुळशी तालुका अध्यक्षपदी युवा नेते भाऊ बाबुराव आखाडे यांची नुकतीच निवड करण्यात आली,
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार महादेवजी जानकर साहेब यांचे कट्टर समर्थक आणि विश्वास कार्यकर्ते म्हणून भाऊ आखाडे यांची ओळख आहे.
तर भाऊ आखाडे हे कुळे गावचे सुपुत्र असून ते कुळे ग्रामपंचायतचे सदस्य राहिले आहेत, मुळशी तालुक्यात त्यांचा दांडगा परिचय असून शिवसेना उपविभाग प्रमुख व विभाग प्रमुख स्थानिक लोकाधिकार समिती अध्यक्ष मुळशी तालुका अध्यक्ष रराहिले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून ते राष्ट्रीय समाज पक्षाचे काम करत असून मुळशी तालुक्यात राष्ट्रीय समाज पक्ष वाढविण्यासाठी ते प्रयत्न करीत आहे.त्यांच्या या कामाची दखल घेत रासपचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांच्या आदेशाने ही निवड करण्यात आली असून तश्या निवडीचे पत्र राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब सुतार यांनी दिले.
यावेळी रासप पुणे जिल्हा अध्यक्ष आप्पासाहेब सुतार, महिला अध्यक्षा सविताताई जोशी, ऍड राजेश्री माने, महिला उपाध्यक्षा कविता पाटील, सविता जाधव, हवेली तालुका अध्यक्ष भरत गडदे झ मनोज जाभूळकर, बाळासाहेब आखाडे ,सुनील आखाडे पुणे शहर युवक अध्यक्ष बालाजी पवार, राजाराम दगडे, रघुनाथ पवार, युवती अध्यक्ष गौतमी पेडडी आदी उपस्थित होते.