Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडरिक्षा-हातगाडी-दोन व चार चाकी वाहने-माल वाहतूक गाडी यांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करा-पोलीस...

रिक्षा-हातगाडी-दोन व चार चाकी वाहने-माल वाहतूक गाडी यांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करा-पोलीस निरिक्षक सुरेंद्र घरड..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे )कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कर्जत नगर परिषद हद्दीतील विभागात वाहतुकीचे नियम योग्य रित्या वाहन धारक , चारचाकी व दोन चाकी वाहन धारक तसेच माल वाहतूक करणारे अवजड वाहन धारक , हातगाडी व छोटे – मोठे विक्रेते पाळत नसल्याने शहरात फक्त अर्धा कि. मी. अंतर असलेल्या बाजारपेठेत दर दिवशी वाहतूक जाम होवून कोंडी होते . याचा फटका व त्रास अनेकांना होत असल्याने आलेल्या तक्रारीचे निरसन करण्यासाठी व येणाऱ्या सणासुदीत वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्जत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरेंद्र घरड यांनी बैठकीचे आयोजन कर्जत पोलीस ठाण्यात केले होते . यावेळी रिक्षा संघटनेचे व हातगाडी विक्रेते युनियन अध्यक्ष तथा नगरसेवक राहुल डाळींबकर , सर्व रिक्षा स्टँड प्रमुख , हातगाडी युनियन पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

यावेळी पोलीस निरिक्षक सुरेंद्र घरड यांनी सर्व रिक्षा धारक व हातगाडी धारक यांनी वाहतुकीला अडसर होईल असे वागू नये , रिक्षा चालक मालक यांनी गाडीचे सर्व कागदपत्रे तयार ठेवावे , तपासणी करताना कुणाकडे अर्धवट कागदपत्र असल्यास त्यावर कारवाई होईल , तर प्रवासी वर्गाशी भांडण होणार नाही , असे वागावे , याबाबतीत व्यापारी संघटना , पालिकेचे मुख्याधिकारी व इतर सर्वांची संयुक्त बैठक घेवून वाहतुकीवर नियंत्रण करण्यात येईल , अशी माहिती दिली.

यावर कर्जत रेल्वे रिक्षा स्टँड चे सल्लागार पत्रकार सुभाष सोनावणे यांनी , सणासुदीचे दिवस असल्याने कर्जत रेल्वे स्टेशन बाहेर ट्रॅफिक पोलीस , अथवा कर्मचारी किंवा होमगार्ड तैनात करावा , म्हणजे तेथे वाहतूक जाम होणार नाही , तसेच बाजारपेठेत नियमाप्रमाणे एकेरी वाहतूक सुरू करावी , कोणी कुठेही वाहने आणत असल्याने एकेरी वाहतूक दुहेरी होवून वाहतूक कोंडी होत आहे , यावर प्रकाश टाकला , जड माल वाहनांना वाहतुकीला बाजारपेठेत अटकाव करावा , हे वाहतूक कोंडी करणाऱ्या समस्या असल्याने यावर त्वरित उपाययोजना केल्यास वाहतुकीला बाधा येणार नाही , तसेच रिक्षाधारक हा ” मुजोर ” वागत नसून आपल्या नियमांचे नेहमीच पालन करत असल्याचे सांगून कोण जादा भाडा घेत असेल तर त्याचे गाडी नंबर देवून तक्रार करावी , मात्र पुरावा नसलेल्या तक्रारी पोलीस स्टेशन व आर टी ओ कडे देवून सर्व रिक्षा धारकांना अपराधी व्हावे लागते , म्हणून तक्रारदारास रिक्षा नंबर टाकण्यास सांगावे , असे सांगितले.
त्यातच कर्जतमध्ये दोन रिक्षा चोरीच्या आढळल्याने सर्व रिक्षा चालक व मालक यांनी आपले कागदपत्रे , परमिट , लायसन्स , इन्श्युरंस , जवळ बाळगावे , व सर्वांनी नियमांचे पालन केल्यास वाहतूक कोंडी होणार नाही , व मार्ग निघेल अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल , असे पोलीस निरिक्षक सुरेंद्र घरड यांनी निक्षून सांगितले.
- Advertisment -

You cannot copy content of this page