if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा (प्रतिनिधी): एका महिलेला रेल्वे मध्ये नोकरी लावण्याचे भासवून वेळोवेळी असे 6 लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वर्षा सांतेश्वर कदम (वय 29, व्यवसाय कॅन्टीन, रा. जिल्हा परिषद शाळेशेजारी, कुरवंडे,लोणावळा, मूळ रा. लोहारा, ता. लोहारा, जि. उस्मानाबाद ) यांनी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. आरोपी ओमकार सुनील भावे (रा. कुसगांव, ता. मावळ, जि. पुणे, व आरोपी रचना सुर्वे (पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात लोणावळा शहर पोलीस स्टे.गु.रजि.नं. 151/2022 भा.द.वि.कलम 420, 467, 468, 471, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी वर्षा कदम यांनी दिलेल्या फिर्यादेनुसार आरोपी-ओमकार भावे व त्याची मैत्रीण रचना सुर्वे यांनी जानेवारी 2019 ते दिनांक 11/10/2022 रोजी पर्यंत आयनएस शिवाजी व लोणावळा येथे वेळोवेळी फिर्यादीच्या ओळखीचा फायदा घेऊन फिर्यादीला भारतीय रेल्वेमध्ये नोकरी लावतो असे भासवून फिर्यादीचा विश्वास संपादन करून फिर्यादीला खोटे अपॉइंटमेंट लेटर दाखवून तसेच भारतीय रेल्वेचे बनावट ओळखपत्र देऊन वेळोवेळी फिर्यादी कडून रोख व ऑनलाईन असे एकूण 8 लाख रुपये घेऊन फिर्यादीला नोकरी लावता न आल्याने फिर्यादीचे दोन लाख रुपये परत दिले. नमुद आरोपिंनी आपापसात संगनमत करून फिर्यादीस भारतीय रेल्वेत नोकरीस लावतो म्हणुन सहा लाख रुपये ची फसवणूक केली असल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पो.ना.अजीज मेस्त्री हे दाखल अंमलदार असून पुढील तपास महीला सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे करत आहेत.