Thursday, July 3, 2025
Homeपुणेकामशेतरेल्वे एक्सप्रेस च्या धडकेने आई व मुलाचा जागीच मृत्यू, कामशेत मावळ येथील...

रेल्वे एक्सप्रेस च्या धडकेने आई व मुलाचा जागीच मृत्यू, कामशेत मावळ येथील घटना…

कामशेत (प्रतिनिधी) : इंद्रायणी नदीपात्रात कपडे धुवून घरी जात असलेल्या महिलेसह मुलाला रेल्वे एक्स्प्रेसची धडक बसली यात महिला व मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि . 27 रोजी सकाळी 11:30 च्या सुमारास कामशेत रेल्वे स्टेशन येथे घडली . सुदैवाने दोन मुलं बचावली.गोदावरी गणेश देवाडे ( वय 28 ) ओम गणेश देवाडे ( वय 6 ) रा . शिंदे चाळ, कामशेत असे रेल्वेच्या धडकेत मृत्यू झालेल्या आई व मुलाचे नाव आहे.
लोहमार्ग पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार गोदावरी देवाडे , ओम देवाडे यांच्यासह चार वर्षाचा मुलगा व दीड वर्षाची मुलगी हे इंद्रायणी नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेले होते. कपडे धुवून घरी परत जाताना , कामशेत रेल्वे स्टेशनवर लोहमार्ग ओलांडताना अगोदर 4 वर्षाचा मुलगा व दीड वर्षाची मुलगी प्लॅटफॉर्मवर सोडली . ओम याला घेऊन येत असताना ,सकाळी 11:30 च्या सुमारास कोईमतूर – कुर्ला एक्स्प्रेस रेल्वे गाडीची जोरात धडक बसून आई गोदावरी व मुलगा ओम यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी लोहमार्ग पोलीस हवालदार शिवाजी सावंत यांनी घटनास्थळी धाव घेतली.
मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन खंडाळा प्राथमिक उप आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.कामशेत येथील अनेक महिला नदीवर कपडे धुण्यासाठी जातात , व जाताना पुलाचा वापर करत नाहीत तरी या घटनेतून काही शिकणार का ? असा सवाल लोहमार्ग पोलिसांनी व्यक्त केला आहे.गरीब व हातावर पोट असलेल्या देवाडे कुटुंबावर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page