Tuesday, September 17, 2024
Homeपुणेलोणावळारोटरी क्लब लोणावळा तर्फे संपर्क बालग्राम भाजे येथील मुलींना मिठाई वाटप करून...

रोटरी क्लब लोणावळा तर्फे संपर्क बालग्राम भाजे येथील मुलींना मिठाई वाटप करून दिवाळी साजरी….

लोणावळा (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ लोणावळा च्या वतीने दिवाळी सनानिमित्त संपर्क बालग्राम भाजे येथील लहानांना मिठाई वाटप करून त्यांची दिवाळी गोड करण्यात आली तसेच येथील मुलींना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी संपर्क भाजे शिक्षिका यांनी रोटरी सभासदांचे स्वागत करून छान आदरातिथ्य केले.शिक्षिका रेखा यांच्यासोबत संस्थेचा फेरफटका मारून प्रकल्पासंबंधी माहिती घेतली.
सुंदर, स्वच्छ परिसर आणि मुलींसाठी अद्ययावत घरे याबाबत संपर्क भाजे चे रोटरी कडून कौतुक करण्यात आले.येथील मुलींना मिठाई वाटप करून दिवाळी सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
तसेच येथील विध्यार्थ्यांना रोटरी क्लब आणि संपर्क संस्था यांच्यातील ऋणानुबंध आणि सहयोगाबाबत माहिती देण्यात आली.
यावेळी रोटरी क्लब लोणावळा चे रोटेरिअन रो.गोरख चौधरी,रो. रवींद्र कुलकर्णी,प्रेसिडेंट रो.आशिष मेहता, रो. स्वेता मेहता, रो.अजय अरगडे, रो.पुंडलिक वानखडे, रो.नारायण शारवाले आदी सभासद उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page