लोणावळा (प्रतिनिधी): सकाळच्या वेळी चर्चला जात असणाऱ्या साठ वर्षीय महिलेस मारहाण केल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना दि.2/11/2022 रोजी सकाळी 8:30 च्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी रुफीना विलसन (वय 60, रा. बारा बंगला, नं.3, दर्याराणी सोसायटी न्यू तुंगार्ली लोणावळा यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत आरोपी अमित प्रेमजी रिटा व प्रेमजी रिटा रा. न्यू तुंगार्ली, लोणावळा यांच्या विरोधात गु.र.नं 164/2022 भा.द.वि कलम 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 2 रोजी सकाळी 08:30 वा.च्या सुमारास दर्याराणी सोसायटीच्या रोडवर अमित प्रेमजी रिटा यांच्या घरासमोर तुंगार्ली लोणावळा फिर्यादी सकाळी 08:30 वा.च्या सुमारास जयचंद चौक चर्चमध्ये जात असताना दर्याराणी सोसायटीच्या रोडवर अमित प्रेमजी रिटा यांच्या घरासमोर आरोपी अमित रिटा व प्रेमजी रिटा यांनी लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या पायावरव गुडघ्यावर आपखुशीने मारहान करून दुखापत आणि शीवीगाळ, दमदाटी केली असल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकाँ शेख हे करत आहेत.