if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
पुणे (प्रतिनिधी):सलग तीन वेळा आमदार असणारे पुणे येथील माजी आमदार स्व.विनायक निम्हण यांचा शोक सभेचा कार्यक्रम बाल गंधर्व नाट्यगृह पुणे येथे शुक्रवार दि.5 रोजी सायंकाळी 5 ते 9 यावेळेत संपन्न झाला. माजी आमदार स्व. विनायक निम्हण यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांनी या सभेत शोक व्यक्त करत स्व. विनायक निम्हण यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी शोक सभेस उपस्थित मान्यवरांनी स्व. विनायक निम्हण यांच्या स्मृतीस अभिवादन केले. त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करून निम्हण यांचे चिरंजीव सनी यांना कोणत्याही क्षेत्रातून सहकार्य लागल्यास आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत असल्याचे मनोगत व्यक्त केले.
स्व. विनायक निम्हण यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने बुधवार दि . 26 रोजी निधन झाले. निम्हण हे सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते . दोन वेळा ते कोथरूड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते . त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर त्यांनी शिवाजीनगर मतदारसंघातूनही विजय मिळवला होता . विनायक निम्हण यांनी शिवसेनेचा सामान्य कार्यकर्ता म्हणून राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली होती . त्यानंतर ते आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर आमदारकीपर्यंत पोहोचले होते . विनायक निम्हण हे कोथरूड मतदारसंघातून दोन वेळेस ( 1999 ते 2009 ) या काळात शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते.
नंतर त्यानी नारायण राणे यांच्याबरोबर काँग्रेस पक्षात प्रवेश करुन शिवाजीनगर मतदारसंघामध्ये ( 2009 ते 2014 ) मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निडून आले होते .तर त्यांच्या पत्नी स्वाती निम्हण ह्या देखील माजी नगरसेविका आहेत व मुलगा सनी निम्हण हे देखील माजी नगरसेवक आहेत.तर लोणावळा येथील समाजसेवक व प्रसिद्ध उद्योजक नंदकुमार (बाबूजी) वाळंज यांचे ते व्याही होते.स्व. विनायक निम्हण यांचा जनसंपर्क दांडगा होता. व मन मिळावू स्वभावामुळे ते राजकारणी असून सर्वांचे चाहते होते. याची प्रचिती शोक सभेतील जनसमुदायाने घडविली.उपस्थित मान्यवरांनी आपापल्या भावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली व सार्वजनिक पसायदानाने शोक सभेची सांगता करण्यात आली.
यावेळी स्व. विनायक निम्हण यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दिपक तायगुडे, जेष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, राष्ट्रवादी काँग्रेस चे श्रीकांत शिरोळ, आर. पी आय (आठवले ) चे प्रदेश सचिव परशुराम वाडेकर, सिने अभिनेते प्रवीण तरडे, काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, स्वयंसेवक संघाचे महेश कारपे, शिवसेनेचे बाळा नांदगावकर, राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप, विजय वडट्टीवार, रामदास फुटाने, बापू पाठारे, आमदार संजय मोरे,निलम गोऱ्हे, सिद्धार्थ शिरोळे,प्रवीण दरेकर,हर्षद निंबाळकर, खासदार श्रीरंग बारणे, उद्योजक नंदकुमार वाळंज, आमदार संजय जगताप, आमदार अतुल बेनके, सत्यजित तांबे, अर्जुन खोतकर, आमदार हर्षवर्धन पाटील, उल्हास पवार आदी दिग्गज नेत्यांसह स्थानिक नागरिक, मित्र परिवार मोठया संख्येने उपस्थित होते.