![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
लोणावळा (प्रतिनिधी): लायन्स क्लब ऑफ डायमंड व मिरा महिला बहूउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने लोणावळा महिला मंडळ सभागृहात महिलांसाठी मोफत एकदिवसीय प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले.
महिलांचे सक्षमीकरनासाठी मिरा महिला बहूउद्देशीय संस्था नेहमीच सक्रिय असते त्यात लायन्स क्लब लोणावळा डायमंडच्या सहाय्याने समाजकार्यात ही संस्था रुजू झाली असून संस्थेच्या संस्थापिका रेषमा शेख आणिअंजुम ऊमरशेख,दीक्षा मोरे,श्रद्धा पंचमुख,सुरभी गुप्ता,अमृता या प्रशिक्षकांनी महिलांना अत्तर, रूम फ्रेशनर व पर्फ्यूम तयार करण्याचे प्रशिक्षण दिले.यावेळी सदर मोफत प्रशिक्षण शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
लायन्स क्लब डायमंडचे अध्यक्ष लायन अनंता गायकवाड, सचिव लायन अनंता पाडाळे, खजिनदार लायन तस्नीम थासरावाला,लायन अनिल झोपे,लायन दाऊद थासरावाला, लायन रेखा पाडाळे, लायन दिपाली डोबले व सर्व सभासद यावेळी उपस्थित होते.तसेच यापुढे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर दिवाळीचे उटणे, पाण्यात तरंगणारे मेणबत्तीचे दिवे, अगरबत्ती, धूपबत्ती आदी प्रशिक्षण मिरा महिला बहूउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने देण्यात येणार असल्याचे रेषमा शेख यांनी सांगितले.