if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
सुधाकर भाऊ घारे यांचा आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर घणाघाती हल्ला…
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे )आमदार महेंद्र थोरवे यांनी मागील निवडणुकीत दिलेला ” वचननामा ” सपशेल खोटा ठरवत त्यांनी आमदार झाल्यावर केलेली कामे हि यापूर्वीच मंजूर झाली असल्याने जनतेची ते ” फसवणूक ” करत असून केलेली कामे देखील ” निकृष्ट ” दर्जाची असल्याने सगळा कारभार व कामांत ” गौडबंगाल ” असल्याचा आरोप करत कर्जत मतदार संघाचे परिवर्तन आघाडीचे अपक्ष उमेदवार सुधाकर भाऊ घारे यांनी सर्व कामांची पत्रकार परिषद घेऊन ” पोलखोल ” आज मंगळवार दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ रोजी त्यांच्या संपर्क कार्यालयात केली . यावेळी व्यासपीठावर परिवर्तन आघाडीचे उमेदवार सुधाकर भाऊ घारे , अशोक भोपतराव , भरत भाई भगत , भगवान शेठ भोईर , भगवान शेठ चंचे , स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम भाई जाधव , मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र दादा पाटील , विलास थोरवे , शिवाजी खारीक , अंकित साखरे , सुरेखा खेडेकर , रंजना धुळे , संतोष बैलमारे , दिपक श्रीखंडे , मनसे चे जेष्ठ नेते प्रवीण दादा गांगल , उमेश गायकवाड , केतन बेलोसे , त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते .
यावेळी सुधाकर भाऊ घारे यांनी मागील निवडणुकीत आमदार महेंद्र थोरवे यांनी जो वचननामा सादर केला त्या संदर्भात त्यांचा ” खरपुस समाचार ” घेत पाच वर्षांत त्यांनी आमसभा देखील घेतली नाही , कोंढाणा धरण , ब्रीज , प्रशासकीय भवन , कर्जत चौक रस्ता , पळसदरी – खोपोली रस्ता हि सर्व कामे माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांनी मंजुरी आणल्याची कागदपत्रे दाखवत ” गौप्यस्फोट ” केला . यांचे पदाधिकारी कधी ८०० करोड तर जिल्हा प्रमुख सांगतात २ हजार तर आमदार २९०० कोटी निधी आणला म्हणतात , पण ही कामे मंजूर झाली तेंव्हा ते आमदार ही नव्हते , कोंढाणा धरणसाठी १४०० कोटी आणले म्हणतात , मग हा निधी गेला कुठे ? असा प्रश्न उपस्थित करत त्यांच्या घराला सुशोभीकरणाला गेले का , असा आरोप त्यांनी केला . मागील वचननामामध्ये असलेल्या विषयातील दवाखाने , कारखान्यात कामगार भरती , पर्यटनासाठी सुशोभीकरण करणार , महिलांना आत्म परीक्षण केंद्र उभे करणार , आदिवासी बांधवांना भाजी व इतर वस्तू विक्रीसाठी बाजारपेठ , कर्जत शहरातील कचरा निर्मूलन करणार , नाट्य गृह , क्रीडा संकुल , वारकरी भवन , पेण अर्बन बँक धारकांच्या पाठीशी ठाम उभे राहून त्यांचे पैसे परत मिळवून देणार , यातील एक ही कामे झाली नाही , हि वचने धांदात ” खोटे ” आहे , यावर प्रकाश टाकत कोंढाणे धरणाचे काम २०१३ मध्ये मंजूर झाले आहेत , रस्त्यांची कामे २०१८ मध्ये निधी मंजूर झाला आहे . पाणी टंचाई अजूनही ग्रामीण भागात आहे , टँकरने पाणी दिले जाते , अजूनही तरुण बेरोजगार असून कंपनीवाले येथून पळून जात आहेत , कुंपणच शेत खात आहे , म्हणून ही परिस्थिती आहे , पेण अर्बन बँक खातेदारांना अजूनही पैसे मिळाले नाहीत , आमदारांनी काहीच प्रयत्न केले नाहीत , त्यांची एक ही बैठक घेतली नाही , असा गौप्यस्फोट त्यांनी करत पेण बँकेसाठी मी प्रयत्न केले , सहकार मंत्री यांच्याशी बैठक लावली , आचार संहिता लागली म्हणून पण मी पुन्हा एकदा प्रयत्न करून पैसे मिळवून देणार , मी निवडून येण्यासाठी जनतेची साथ मला हवी , असे आवाहन देखील त्यांनी केले .
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून झालेली येथील रस्ते निकृष्ट दर्जाचे केले आहेत , त्यामुळे सर्व कामांत भ्रष्टाचार झाल्याचे त्यांनी सांगत खोपोली येथील बंदिस्त गटारे अद्यापी झाली नाहीत , त्याचा मलिदा कोण खातो ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला , तर जोड नदी प्रकल्प करणार होते , पण ते ही काम झाले नाही , वरील सर्व कामे माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांनी मंजूर केली आहेत , तर भिसेगाव कर्जत रेल्वे भुयारी मार्ग हा रस्ता कर्जत न. प. च्या मा. नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी मंजुरी आणली आहे . यावर देखील त्यांनी खुलासा केला . जनतेने मला संधी दिल्यास येणाऱ्या काळात बंद पडलेल्या सर्व कंपन्या पुन्हा सुरू करून नवीन कंपन्या या मतदार संघात कश्या येतील , याचा प्रयत्न करेन , तर पळसदरी – खोपोली रस्त्याचा तिढा सोडावणार , असे आश्वासन त्यांनी दिले .
यावेळी कर्जत तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे बोरगाव , कर्जत , कोल्हारे या गावातील अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना पाठींबा दिला , तर नेरळ येथील अनेक महिलांचा पक्ष प्रवेश याप्रसंगी झाला . उमेदवार सुधाकर भाऊ घारे यांच्या आजच्या पत्रकार परिषदेत केलेल्या गौप्यस्फोटाच्या आरोपांमुळे आता महायुतीचे उमेदवार आमदार महेंद्र शेठ थोरवे यावर काय उत्तर देतात , याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे .