![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
राजमाता जिजाऊ फाउंडेशनच्या अध्यक्षा ऍड . पूजा सुर्वे यांचा पुढाकार…
भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) ” शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे , ते जो प्राशन करेल , तो जगात कुठेही गुरगुरल्याशिवाय रहाणार नाही ” असा महामंत्र डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणून दिला होता . तर त्यांच्या शिक्षणासाठी छत्रपती शाहू महाराजांनी खूप मदत केली होती.
हिच धारणा मनाशी ठेवून आपणही या समाजाचे देणे आहोत , म्हणूनच गरीब गरजू कुटुंबाला मदत करणाऱ्या , विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना शालेय साहित्य वाटप करून शिक्षणासाठी प्रोत्साहित करणाऱ्या , वृक्षारोपण करून नागरिकांना स्वस्थ जीवन जगणे व पर्यावरणाचे रक्षण करणे , याचा प्रयत्न करणाऱ्या , शिक्षण , इतर अधिकार , नोकरीत आरक्षण , देऊन महिलांना गरुड भरारी घेण्यास पाठबळ देणारे ” लोकराजा छत्रपती शाहू महाराज ” यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून ” सामाजिक न्याय दिवस ” खऱ्या अर्थाने साजरा व्हावा , या उद्दात हेतूने सामाजिक कार्य करून त्यांना अभिवादन आज कर्जत तालुक्यातील पळसदरी हद्दीतील राजकीय व सामाजिक कार्यकर्त्या ” राजमाता जिजाऊ फाउंडेशनच्या ” संस्थापक अध्यक्षा ऍड. सौ . पूजा प्रताप सुर्वे यांनी केले.
राजमाता जिजाऊ फाऊंडेशन तर्फे व अध्यक्षा ऍड सौ. पूजा सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक २६ जून २०२३ रोजी ” राजे श्री छत्रपती शाहु महाराज ” जयंती निमित् पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषदेच्या पळसदरी, पळसदरी ठाकूरवाडी, तिघर – नांगुर्ले , तिघर धनगर वाडी , वरणे , वरणे ठाकूरवाडी , आदी शाळांमध्ये छत्रपती शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने त्यांच्या कार्याची माहिती सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांना सांगण्यात आली . त्याचप्रमाणे सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांना ५८० वहयांचे वाटप अध्यक्षा ऍड. सौ. पूजा सुर्वे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
” राजमाता जिजाऊ फौंडेशनच्या ” अध्यक्षा सौ. पूजा प्रताप सुर्वे यांनी पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्याना याप्रसंगी मार्गदर्शन करताना छत्रपती शाहू महाराजांनी महिलांसाठी , उपेक्षितांसाठी भरीव कामगिरी केली आहे , याची आठवण करून दिली आणि विद्यार्थ्यांनी मोठे झाल्यावर आपल्या गावासाठी आणि देशासाठी भरीव काम करावे , असे मौलिक मार्गदर्शन सुध्दा केले. या सामाजिक न्याय दिन उपक्रमात सुवर्णा सुर्वे, कांचन देशमुख सर्व शाळेतील शिक्षक पूजा पवार मॅडम , शारदा साबळे मॅडम, नीतेश दरेकर सर, छाया जाधव मॅडम आदी शिक्षक वर्ग उपस्थित होते.