लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासकीय कार्यकाळात मावळचे लोकप्रिय आमदार जातीने लक्ष घातल्याने पावसाळ्या पूर्वी शहरातून वाहणारी नदी, नाले आणि गटार सफाईची कामे अगदी योग्य पद्धतीने आणि युद्ध पातळीवर सुरू आहेत . याबद्दल तत्कालीन प्रशासक सोमनाथ जाधव यांनी आवश्यक असलेली कामे करायची ती लोणावळा नगरपरिषदेने वेळापत्रक आखून व्यवस्थित कर्मचारी आणि ठेकेदार यांचे समन्वय साधत नियोजनपूर्वक कामे सुरु केली आहेत. त्यानुसार मुसळधार पावसाने ज्या भागात गटारी तुंबतात , ज्याठिकाणी पाणी साचते त्याठिकाणी प्राथमिकता देवून सोमनाथ जाधव यांनी उत्तम नियोजन केले .
लोणावळा नगरपरिषदेचे प्रशासकीय कार्यकाळातील कामकाज तत्कालीन मुख्याधिकारी तथा प्रशासक सोमनाथ जाधव यांनी अगदी उत्तम रीतीने पार पाडले आहे . नागरिकांच्या हिताचे धोरणात्मक निर्णय सुद्धा मुख्याधिकारी यांना घेण्याचा अधिकार आहे त्यामुळे ती कामे स्थगित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही अशी माहिती माजी नगरसेवक भरत हरपुडे यांनी दिली आहे.
नांगरगाव येथील निसर्ग आणि आदर्श कॉलनी मधील अंचुरकर यांचे घर तर बळकवडे यांचे घर ते शांता लॉज , हिंदुस्तान हार्डवेअर पर्यंत जाणारा नाला गटार सफाई करण्यात आली आहे. तुंगार्ली , नारायणी धाम पासून निघणारा मोठा नाला त्यामध्ये बद्रिविशाल सोसायटीची सर्व लहान , मोठी गटारे , टाटा डकलेन खालून मुनीर हॉटेलपासून ते मुबई पुणे जूना महामार्ग क्रॉस करून खालून जाणारा नाला हिंदुस्तान हार्डवेर पासून जाणारा नाला सफाई झाली आहे . सुमित्रा हॉल ते रेल्वे रुळापर्यंत नाला सफाई पूर्ण झाली आहे . खंडाळा शनी मंदिर पासून निघणारा नाला गटार ते जुना पुणे मुंबई हायवे क्रॉस करून खंडाळा शाळा ते सिंडिकेट बँक पासून खाली दरी संपूर्ण काम झाले आहे . भाजी मार्केट मागील नाला, टेबल लेन ते इंद्रायणी नदी पर्यंतची कामे झाली आहेत. त्याचबरोबर शहरातील सर्व पावसाळ्या पूर्वीची कामे प्रशासन अगदी योग्य आणि तत्परतेने करीत आहेत तसेच भूमिगत केबल टाकण्यासाठीची कामे देखील प्रशासनाने पावसाळा सुरु होण्यापूर्वी करून घ्यावी अशी मागणी भरत हरपुडे यांनी लोणावळा नगरपरिषदेकडे केली आहे.