लोणावळा(प्रतिनिधी): मावळ तालुका असंघटित कामगार संघ आयोजित नवरात्र उत्सव 2022 गावठाण लोणावळा मंडळास मावळातील मान्यवरांच्या भेटी. यावर्षीचे मुख्य आकर्षण म्हणजे शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिर प्रतिकृती.
असंघटित कामगार संघ मावळचे संस्थापक अध्यक्ष व लोणावळा नगरीचे माजी नगराध्यक्ष अमित गवळी यांच्या संकल्पनेतून दर वर्षी नवरात्रोत्सवात भव्य प्रतिकृती देखावे सादर करून ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत देवीची भव्य मिरवणूक काढत घट स्थापनेच्या दिवशी देवीची प्रतिष्ठापना करण्यात येते. तसेच नऊ दिवस भक्ती भावाने देवीची पूजा अर्चा व आरती करण्यात येत आहे. यावेळी चौथ्या माळेनिमित्त वडगांव नगरपंचायतचे नगराध्यक्ष मयुर ढोरे, मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोलीताई ढोरे, नगरसेविका पुनमताई जाधव , छायाताई जाधव यांनी उपस्थित राहून मोरया ढोल ताशा पथकच्या सदस्यांनी रास गरबा खेळून मनसोक्त आनंद लुटला.
यावेळी उपस्थित पाहुण्यांचे संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष अमित प्रकाश गवळी, शालिनी अमित प्रकाश गवळी , माजी नगरसेवक गिरीष रमेश कांबळे,सामाजिक कार्यकर्ते सुमित प्रकाश गवळी , जफर् खिजर शेख , महेश खराडे, जीवन गायकवाड आदी मान्यवरांसह असंघटित कामगार संघ व मोरया ढोल ताशा पथकाचे सदस्य उपस्थित होते.