Friday, November 22, 2024
Homeपुणेमावळलोणावळा ग्रामीण परिसरात साखळी उपोषणास सुरुवात..

लोणावळा ग्रामीण परिसरात साखळी उपोषणास सुरुवात..

कार्ला (वार्ताहर): कार्ला ग्रामीण परिसरातील पाटण,वरसोली व शिलाटणे गावांत साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली.
सकल मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या लढ्यास प्रोत्साहन म्हणून कार्ला परिसरात वरसोली,पाटण व शिलाटणे या गावांमध्ये साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे.आज शिलाटणे येथील साखळी उपोषणाचा पाचवा दिवस आहे.विविध गावांमधील ग्रामस्थ व महिलांनी साखळी उपोषणास सुरुवात केली आहे.
पाटण येथील तरुण व महिलांनी सुरु केलेल्या साखळी उपोषणात भजन रुपी सेवा सुरु करण्यात आली ,तर शिलाटणे येथे साखळी उपोषणाच्या चौथ्या दिवशी महिला व तरुनींनी उपोषण सुरु केले तर वरसोली गावात काल दि.4 रोजी साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली.एक मराठा कोटी मराठा अशा घोषणा देत वरसोली ग्रामपंचायतचे सरपंच संजय खांडेभरड,शाम येवले, नामदेव पटेकर, सदस्य केतन खांडेभरड, अशोक कुटे, अनिल खांडेभरड, संतोष मा खांडेभरड,राजू मधुकर खांडेभरड,बाळु गेनु खांडेभरड, राजू दशरथ खांडेभरड, विजय नलवडे आदी ग्रामस्थांनी उपोषणास सुरुवात केली.
- Advertisment -

You cannot copy content of this page