Sunday, September 8, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा ग्रामीण पोलिसांची कडक कारवाई : अवैध हुक्का व्यवसायावर धडक..

लोणावळा ग्रामीण पोलिसांची कडक कारवाई : अवैध हुक्का व्यवसायावर धडक..

लोणावळा : ( श्रावणी कामत ) लोणावळा ग्रामीण पोलीस जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या हुक्का विक्रेत्यांवर धडक कारवाई केली आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, मा. श्री. पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.
दि. 6 जुलै 2024 रोजी सायं 5:45 वाजता आतवण गावच्या टायगर पॉईंट येथील मंगेश स्नॅक्स सेंटरमध्ये छुप्या पद्धतीने हुक्का विक्री केली जात असल्याचे आढळले. या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून मंगेश नंदु कराळे आणि राकेश गणपत वारे या दोन इसमांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विविध हुक्का आणि फ्लेवर्स जप्त करण्यात आले, ज्याची एकूण किंमत 2,500 रुपये आहे.
अवैध रीत्याने हुक्का चालवणाऱ्यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता 2023 चे कलम 223 आणि सिगारेट व इतर तंबाखुजन्य उत्पादने अधिनियम 2003 (सुधारीत 2018) चे कलम 4 (अ) व 21 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गाले करत आहेत.
ही कारवाई . पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, आणि श्री. सत्यसाई कार्तिक, सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, लोणावळा विभाग यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, पोलीस हवालदार जय पवार (ब.नं. 1982), आणि पोलीस कॉन्स्टेबल सिध्देश्वर शिंदे (ब.नं. 1948) यांनी हुक्का विक्रेत्यांवर कारवाई केली आहे.
लोणावळा ग्रामीण पोलीसांनी अवैध हुक्का व्यवसायावर केलेली ही कारवाई जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वाची ठरली आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page