if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
प्रतिनिधी : श्रावणी कामत
मावळ : तालुक्यातील लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दि. १ नोव्हेंबर रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. निलेश दत्तात्रय कडू (वय ३२, रा. सावंतवाडी, ता. मावळ) याचा दि. ३१ ऑक्टोबर रोजी रात्री प्रभाचीवाडी फाट्याजवळ असलेल्या जमिनीत अज्ञात कारणावरून हल्ला करून खुन करण्यात आला होता. त्याच्या डोक्यावर अज्ञात हत्याराने वार करण्यात आले आणि दगडाने ठेचून त्यास ठार मारण्यात आले.
हा गुन्हा अत्यंत गंभीर आणि संवेदनशील मानून पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातून ३ पथके स्थापन करून आरोपींचा शोध घेतला गेला. सलग ३० तास तपास करून मुख्य आरोपीला तळेगाव येथून अटक करण्यात आली. चौकशीत उसनवारीने घेतलेले पैसे परत न दिल्यामुळे हा खुन झाल्याचे स्पष्ट झाले. या खुनात आणखी दोन आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यांनाही अटक करण्यात आली आहे.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी लोणावळा विभागाचे राजेंद्र मायने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत आवारे, महिला पोलिस उपनिरीक्षक विजया म्हेत्रे, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे, सफौ. युवराज बनसोडे, अजय दरेकर, पोहवा. नितीन कदम, विजय गाले, जय पवार, नवनाथ चपटे, विजय मुंढे, भुषण कदम, मपोहवा. पुष्पा घुगे, पोकॉ. केतन तळपे, सागर धनवे, सतिश कुदळे, राहुल खैरे, ऋषीकेश पंचरस, संजय पंडीत, अरूण पवार, प्रशांत तुरे, रोहीत गायवाड, मपोकॉ. रितीका मुंगसे यांनी केली.
गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत आवारे करीत आहेत.