लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून पवना नगर परिसरात नाकाबंदी दरम्यान 170 वाहनांची तपासणी तर विना मास्कची कारवाई..
मावळ : नाताळ व 31 डिसेंबर च्या पार्श्व् भूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलीसांकडून जागोजागी चेक पोस्ट.
लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील पवनानगर भागात प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून ब्राम्हणोली चौक व काले फाटा याठिकाणी पोलीस स्टेशन व पवना पोलीस चौकीच्या स्टाफसह नाकाबंदी व वाहन चेकिंग करण्यात आली. चेकिंग दरम्यान 170 पेक्षा जास्त वाहने व संशयित वाहने चेक करण्यात येऊन ब्रेथ अनालायझरने वाहन चालकांची तपासणी करून मास्क वापराबाबत जनजागृती करण्यात आली.
त्याचबरोबर विनामास्क असणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच पवनानगर भागातील वाहतुकीस अडथळा येणाऱ्या विविध ठिकाणांना भेटी देऊन वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने स्थानिकांना व पोलीस अंमलदार यांना योग्य ते मार्गदर्शन असून यावेळी पोलीस व जनता मोबाईलद्वारे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करण्यात आली आहे.
ख्रिसम व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची मावळात वाढणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. नवीन वर्षानिमित्त पर्यटकांचे स्वागत असताना त्यांच्या मधून गुन्हेगारांचा शिरकाव होणार नाही व अनंदोत्सवाच्या पार्श्व् भूमीवर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व चेक नक्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.
तरी यावेळी स्थानिक नागरिकांनी आपापल्या परिसरात सतर्क राहून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी केले आहे.