Friday, November 22, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनकडून शाळांतील विध्यार्थीनींना स्वरक्षणाचे धडे...

लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनकडून शाळांतील विध्यार्थीनींना स्वरक्षणाचे धडे…

लोणावळा(प्रतिनिधी): लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने हद्दीतील शालेय विद्यार्थिनींना स्व-रक्षणाचे धडे देण्यात आले.

मागील महिन्यात पवना नगर,कोथूर्णे येथील बालिका अत्याचार घटनेच्या आधारावर विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील औंढे,कार्ला, देवघर येथील माध्यमिक विद्यालयातून महिला दक्षता समितीच्या माध्यमातून स्वरक्षणासाठी सभांचे आयोजन करण्यात आले होते.

त्यानुसार औंढे येथील नागनाथ माध्यमिक विद्यालय येथे लोणावळा ग्रामीण महिला दक्षता समिती सभा अध्यक्षा रतन देशमुख, पोलीस पाटील दिपाली विकारी, लता गायकवाड, विमल पवार, शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा देशमुख, शांता मंडले श्रीहरी पावशेरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मुलींना स्वरक्षणासाठी काय करावे या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.

तसेचदेवघर येथील स्व. वामनराव हैबतराव देशमुख माध्यमिक विद्यालयात विद्यालयाचे मुख्याध्यापक बी बी पाटील,मनीषा ठीकेकर, प्रवीणकुमार हुलावळे, विजय कचरे,विजय गायकवाड, पोलीस पाटील अनंता शिंदे, नवनाथ देशमुख,सुरेश देशमुख, भगवंत क्षीरसागर यांच्या उपस्थितीत सभा आयोजित करण्यात आली होती.

मान्यवरांनी कोथूर्णे तेथे चिमुकलीवर अत्याचार करून हत्या केल्याच्या घटनेचा निषेध करून सभेला सुरुवात करण्यात आली.पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी उपाय योजना सुचविण्यात आल्या. एखादी घटना का घडते? सुरुवातीला घटना शुल्लक असतानाच मुलींनी जागृत होऊन घडलेल्या घटनेची माहीती घरातील व शाळेतील जबाबदार व्यक्तींना सांगितली तर पुढील गंभीर घटना टाळता येऊ शकतात असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. शांता मंडले यांनी आपत्ती व्यवस्थापन विषयी माहिती सांगितली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीणकुमार हुलावळे यांनी केले तर आभार विजय कचरे यांनी मानले.

- Advertisment -

You cannot copy content of this page